Rashmika Mandanna Ex Boyfriend : सौंदर्य आणि चंचल स्वभावाने दक्षिणात्या चित्रपटांपासून बॉलिवूडपर्यंत सर्वांची मनं जिंकणारी रश्मिका मंदाना नेहमीच चर्चेत असते. तिच्या चित्रपटांसोबतच तिचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत असतं. विशेषतः तिची नाती. रश्मिकाच्या साखरपुड्याची आणि नंतर तिच्या अचानक ब्रेकअपची कहाणी तेव्हाही चर्चिली गेली होती. रश्मिकाचा पहिला प्रियकर कोण होता आणि ते का वेगळे झाले?
किरीक पार्टीच्या सेटवर सुरू झाली होती ती प्रेमकहाणी
रश्मिका मंदाना हिचा पहिला प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून कन्नड चित्रपट क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रक्षित शेट्टी आहे. २०१६ चा सुपरहिट चित्रपट किरीक पार्टीच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. चित्रपटाच्या यशानंतर, त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि लवकरच ते कन्नड उद्योगातील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक बनले.
त्यांची जोडी चाहत्यांमध्ये इतकी लोकप्रिय होती की, २०१७ मध्ये जेव्हा रश्मिका आणि रक्षितने त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली तेव्हा सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यांचा साखरपुड्याचा सुंदर समारंभ पार पडला. दोघेही खूप आनंदी होते. त्यावेळी रश्मिका अवघी २१ वर्षांची होती. तर रक्षित ३४ वर्षांचा. त्या दोघांमध्ये तब्बल १३ वर्षांचं अंतर होतं.
साखरपुड्याच्या एका वर्षात नात्यात दुरावा...
सर्वकाही छान सुरू होतं. मात्र साखरपुड्याच्या एका वर्षानंतर आलेल्या वृत्तांनी चाहत्यांना धक्का बसला. रश्मिका आणि रक्षितने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला होता. ब्रेकअपबद्दल ते कधीच मोकळेपणाने बोलले नाहीत. मात्र हा निर्णय दोघांनी चर्चा करून घेतल्याचं ते वारंवार सांगतात. दोघंही एकमेकांचा सन्मान करतात. ब्रेकअपनंतरही दोघांनी कधीच एकमेकांबद्दल वाईट शब्द उच्चारला नाही. रश्मिकाने अनेकदा मुलाखतीत सांगितलं की, रक्षित त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता.