अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक संध्याकाळ घालवण्यासाठी रेखा यांनी सोडला होता चित्रपट! मानधनही केलं परत

जाहिरात
Read Time: 2 mins
Rekha Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यासोबत संध्याकाळ घालवण्यासाठी रेखा यांनी रणजीत यांचा चित्रपट सोडला होता.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावरील आपले प्रेम कधीही लपवले नाही. त्या नेहमीच याबद्दल बोलत असत, पण अमिताभ बच्चन यांनी मात्र ते कधीच स्वीकारले नाही. 

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील प्रेम चित्रपटाच्या सेटवरूनच सुरू झाले होते. दोघेही एकमेकांत हरवून गेले होते. एकदा तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी रेखा यांनी एक चित्रपटही सोडला होता. याबद्दल खलनायक रणजीत यांनी खुलासा केला होता. रणजीत हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटही बनवले आहेत. त्यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी रेखा यांनाही करारबद्ध केले होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रणजीत यांच्या चित्रपटात रेखा काम करणार होत्या

रणजीत यांनी एकदा खुलासा केला होता की ते खलनायकाच्या भूमिका करून कंटाळले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. रणजीत यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, 'मी अभिनय सोडला, तेव्हा मी एक पटकथा लिहिली आणि धर्मेंद्र, रेखा आणि जया प्रदा यांच्यासोबत एक चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला.'

( नक्की वाचा : अमिताभ बच्चननं 'या' कारणासाठी केलं जयाशी लग्न... अन्यथा नसते आज पती-पत्नी )
 

रेखा या रणजीत यांच्या जुन्या मैत्रीण आणि 'सावन भादों' या चित्रपटातील सहकलाकार होत्या. रणजीत पुढे म्हणाले, "मी 'सावन भादों'मध्ये रेखासोबत माझ्या आयुष्यातील पहिला शॉट दिल्यापासून आम्ही चांगले मित्र आहोत.'

Advertisement

रेखा यांनी चित्रपट सोडला

रणजीत यांनी पुढे सांगितले की, 'रेखाने एक वैयक्तिक विनंती केली, तेव्हा गोष्टी बदलल्या. 'कारनामा' या चित्रपटाचे संपूर्ण पहिले शेड्यूल संध्याकाळच्या शिफ्टचे होते. एक दिवस रेखाने फोन करून विनंती केली की मी शेड्यूल सकाळी करू शकेन का, कारण तिला संध्याकाळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत वेळ घालवायचा होता.

( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
 

" रणजीत पुढे म्हणाले, "मी नकार दिला. त्यामुळे तिने चित्रपट सोडला आणि साइनिंग अमाऊंटची रक्कम परत केली.' त्यानंतर रणजीत यांच्या चित्रपटात रेखा यांनी काम केलं नाही.

Topics mentioned in this article