सुपरस्टारसोबत पहिला एकमेव चित्रपट, 50 हजार कोटींची मालकीण; बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री अचानक गायब

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिने तिच्या कारकिर्दीत फक्त एकच चित्रपट केला. नंतर चित्रपट जगताला निरोप दिला.

जाहिरात
Read Time: 2 mins
फिल्म इंडस्ट्री से गायब हुईं ये सुपरस्टार
नवी दिल्ली:

richest Bollywood actress gayatri joshi : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार होऊन गेले ज्यांनी एक-दोन चित्रपट केले आणि नंतर अज्ञातवासात निघून गेले. करिअरच्या शिखरावर शोबिज सोडलेल्या या स्टार्सनी स्वतःचं वेगळं जग निर्माण केलं आणि एक नवीन व्यवसाय सुरू केला. यामध्ये एक खास नाव समाविष्ट आहे. त्या अभिनेत्रीने  बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिने तिच्या कारकिर्दीत फक्त एकच चित्रपट केला. नंतर चित्रपट जगताला निरोप दिला. परंतु चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर ही अभिनेत्री आज 50 हजार कोटी रुपयांची मालकिण आहे. 

कोण आहे ही अभिनेत्री?

ज्या चित्रपट आणि अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत, ती स्वदेश (Swadesh Movie) चित्रपटातील प्रमूख भूमिका साकारणारी गायत्री जोशी. २००४ मध्ये आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित स्वदेश या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले. ऑस्करसाठीही या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. गायत्रीचा हा एकमेव चित्रपट आहे. या चित्रपटानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये फेमस झाली होती. या चित्रपटात शाहरुख आणि गायत्रीच्या जोडीचं खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटानंतर गायत्री बॉलिवूडमधील मोठं नाव ठरेल असं म्हटलं जात होतं. मात्र बॉलिवूडला राम राम ठोकून तिने चाहत्यांना धक्का दिला. 

 

नक्की वाचा - Smriti Irani Daughter Photo: स्मृती इराणीच्या मुलीचे 10 न पाहिलेले फोटो पाहून म्हणाल: ही तर हुबेहूब तुलसीसारखी

सिनेविश्व का सोडलं? 

गायत्रीचा डेब्यू चित्रपट हिट झाला होता. मात्र तरीही ती  चित्रपटविश्वातून का बाहेर पडली? गायत्रीने स्वदेश प्रदर्शित झाल्याच्या पुढच्या वर्षी २००५ मध्ये व्यावसायिक विकास ओबेरॉयसोबत लग्न केलं होतं. यानंतर ती बॉलिवूडमधून बाहेर पडली. विकास ओबेरॉय भारतातील बड्या उद्योजकांपैकी एक आहे. ते भारतातील रियल इस्टेट कंपनी ओबेरॉय कन्स्ट्रक्शन चालवितात. फोर्ब्समधील दिलेल्या माहितीनुसार, 50 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. शाहरुख खानची हिरोईन ५० हजार कोटींची मालकिण आहे.  

Advertisement