Richest Man Of Bollywood: तीनवेळा कंगाल झाला, टूथब्रश विकले; आज शाहरूख खानपेक्षा आहे जास्त संपत्ती

Richest Man Of Bollywood: चित्रपटांची निर्मिती करणे हा आज एक मोठ्या उद्योग बनला असून यामध्ये अनेकांनी आपले नशीब आजमावून पाहिले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Richest Man Of Bollywood: शाहरूख खान याची संपत्ती 12 हजार 500 कोटी इतकी असून या निर्मात्याची संपत्ती त्याहून अधिक आहे.
Ronnie Screwvala FB
मुंबई:

Richest Man Of Bollywood: हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलीवूड अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. इथे एकदा यश मिळालं की पाठी वळून पाहण्याची वेळच येत नाही. यशासोबत अपार पैसा आणि प्रसिद्धी आपोआप मिळत जाते. यामुळेच बॉलीवूडमध्ये आपले करिअर व्हावे यासाठी अनेकजण धडपडत असतात. यातले काहीजण हे पडद्यावरचे कलाकार असतात तर काहीजण पडद्यामागे काम करणारे असतात. चित्रपटांची निर्मिती करणे हा आज एक मोठ्या उद्योग बनला असून यामध्ये अनेकांनी आपले नशीब आजमावून पाहिले आहे. त्यात काहींना यश मिळाले तर काहींना अपयश. आजच्या घडीला यशस्वी निर्मात्यांपैकी एक असलेल्या व्यक्तीने अपार कष्टाने यश मिळवलं आहे. आजघडीला हा निर्माता इतका श्रीमंत झाला आहे की त्याने याबाबतीत शाहरूख खान यालाही मागे टाकले आहे. 'हुरून'ने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या निर्मात्याचेही नाव असून या यादीनुसार शाहरूख खान याची संपत्ती 12 हजार 500 कोटी इतकी आहे तर या निर्मात्याची संपत्ती 13 हजार 314 कोटी रुपये इतकी आहे. 

नक्की वाचा: 'तुमची जन्नत दुबईत, मग भारतात काय करताय?' शाहरुखच्या प्रामाणिकपणावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सवाल

टूथ ब्रशची फॅक्टरी ते बॉलीवूड निर्माता

ज्या निर्मात्याबद्दल बोलतोय त्याचे नाव आहे रॉनी स्क्रूवाला. रॉनी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवार ब्रशनिर्मिती करणाऱ्या लहानशा कारखान्यापासून केली होती. त्यानंतर त्यांनी UTV नावाची प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली.  या कंपनीने मालिका आणि चित्रपट दोन्हीची निर्मिती केलीय. स्वदेस, रंग दे बसंती, जोधा अकबर, अ वेनस्डे हे याच कंपनीने निर्मित केलेले चित्रपट आहेत. रॉनी स्क्रूवाला यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की त्यांना सुरूवातीच्या काळात उद्योगामध्ये तीनवेळा अपयश आलं होतं आणि त्यांना दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. एकवेळ अशी आली होती की त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्याचेही पैसे उरले नव्हते. त्यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ती वेळ अशी होती की माझ्याकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसेच नव्हते. त्यावेळी माझ्या कर्मचाऱ्यांनीच मला दारू पाजली होती. 

नक्की वाचा: अमिताभ बच्चन यांनी जलसा, प्रतीक्षा, जनक बगल्यानंतर खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी

UTV विकून सुरू केली दुसरी कंपनी

रॉनी स्क्रूवाला यांनी त्यांची UTV कंपनी कालांतराने डिस्नेला विकून टाकली होती. हा सौदा अंदाजे 12,420 कोटी रुपयांना झाला होता. यानंतर स्क्रूवाला यांनी RSVP Movies नावाची नवी कंपनी स्थापन केली. लव पर स्क्वेअर फूट, लस्ट स्टोरीज हे चित्रपट याच कंपनीने बनविले आहेत. रॉनी, तरूणांना प्रेरणा देणारी व्याख्याने देत असतात. असफलता हा माणसाचा सगळ्यात मोठा शिक्षक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पराभव हीच यशाची पहिली पायरी असते असे त्यांचे म्हणणे आहे. आपण केलेल्या चुका, त्यामुळे अपयश हे इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी ते तरुणांना मार्गदर्शन करत असतात. हिंमतीच्या जोरावर रॉनी यांनी आपले साम्राज्य उभे केले असून, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी इथपर्यंत मजल मारली आहे. रॉनी स्क्रूवाला यांचे नाव बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतले जाते. शाहरूख खान, करण जोहर, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, जुही चावला यांच्या यादीत त्यांचेही नाव समाविष्ट झाले आहे.  

Topics mentioned in this article