Kantara 2 Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर 1' चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

Kantara: A Legend Chapter-1 Box Office Collection Day 1: साल 2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'कांतारा' हा चित्रपट कन्नड भाषेत बनवला गेला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 400 ते 450 कोटी रुपयांची विक्रमी कमाई करून सर्वांना चकित केले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kantara 2 Box Office Collection Day 1
मुंबई:

Kantara: A Legend Chapter-1 Box Office Collection Day 1:  दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कांतारा: चॅप्टर 1' ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात केली आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'कांतारा' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हा प्रीक्वल असून, 2 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा देशभरात आणि जगभरात प्रदर्शित झाला. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाला 4.5 स्टार्स देऊन त्याचे कौतुक केले आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क' च्या प्राथमिक आकडेवारीनुसार, 'कांतारा: चॅप्टर 1' ने भारतात पहिल्या दिवशी 60 कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली आहे. तर, जगभरातील कमाईचा आकडा 80 ते 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आकडेवारी 'कांतारा' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे.

साल 2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'कांतारा' हा चित्रपट कन्नड भाषेत बनवला गेला होता. केवळ 14 कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 400 ते 450 कोटी रुपयांची विक्रमी कमाई करून सर्वांना चकित केले होते. 'कांतारा'ने पहिल्या दिवशी केवळ 6 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. मात्र 'माऊथ पब्लिसिटी'मुळे कमाई वाढत गेली आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व सिद्ध केले.

या पार्श्वभूमीवर, 'कांतारा: चॅप्टर 1' ने पहिल्याच दिवशी 60 कोटी रुपयांची कमाई करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे चित्रपटाला भविष्यात मिळणाऱ्या यशाचे संकेत स्पष्ट झाले आहेत.

Advertisement

चित्रपटाबद्दल अधिक माहिती

'कांतारा: चॅप्टर 1' ची कथा ऋषभ शेट्टीने लिहिली असून, याचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. विजय किरगंडुर याने होम्बले फिल्म्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टीसह जयराम, राकेश पुजारी आणि रुक्मिणी वसंत यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बी. अजनीश लोकनाथ यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

हा बहुभाषिक चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी कन्नड, हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे, येत्या काही दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे रेकॉर्ड मोडेल, असा विश्वास सिने-व्यापारात व्यक्त केला जात आहे.