Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई, पण सेटवर मात्र कलाकारांमध्ये भेदभाव, 'या' अनुभवाने सर्वच हादरले

Ranveer Singh Dhurandhar 2 News: रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dhurandhar 2 : रणवीर सिंहच्या धुरंधर 2 ची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
मुंबई:

Ranveer Singh Dhurandhar 2 News: रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी, आता या चित्रपटाच्या सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेटवर कलाकारांमध्ये कशा प्रकारे भेदभाव केला जातो, याचे जळजळीत वास्तव एका नवोदित कलाकाराने मांडले आहे. या खुलासामुळे चित्रपटसृष्टीतील झगमगाटामागे दडलेला अंधार आता चर्चेचा विषय ठरला आहे.

नवोदित कलाकाराचा सेटवरील विदारक अनुभव

मुंबईत अभिनयाचे स्वप्न घेऊन 2025 मध्ये दाखल झालेल्या एका तरुण कलाकाराला 'धुरंधर 2' या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच मोठ्या सिनेमाबाबत तो प्रचंड उत्सुक होता आणि मोठ्या स्टार्ससोबत काम करायला मिळणार म्हणून आनंदी होता. 

Advertisement

मात्र, सेटवर पोहोचल्यानंतर त्याला आलेला अनुभव अत्यंत क्लेशदायक होता. या कलाकाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून सेटवर कशा प्रकारे दुजाभाव केला जातो, याचे अनुभव शेअर केले आहेत.

( नक्की वाचा : Dhurandhar 2: दाऊद इब्राहिम जिवंत आहे की मृत? 'धुरंधर 2' मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा चर्चा )

एसी केवळ मोठ्या स्टार्ससाठीच?

या कलाकाराने सांगितल्यानुसार, शूटिंग सुरू असताना सेटवर प्रचंड उकाडा होता आणि उष्णतेमुळे सर्वच जण हैराण झाले होते. थोडा दिलासा मिळावा म्हणून त्याने एअर कंडिशनचा (AC) रोख स्वतःच्या दिशेला वळवला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या क्रू मेंबरने त्याला तातडीने रोखले. 'हे एसी तुझ्यासाठी नाहीत, ते केवळ मोठ्या स्टार्ससाठी आहेत,' असे त्याला सुनावण्यात आले. बॅकग्राउंड आर्टिस्टना अशा सुविधा वापरण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट सांगण्यात आल्याने त्या कलाकाराला प्रचंड अपमानित वाटले.

आपल्याला किमान मूलभूत सुविधा तरी मिळाव्यात, अशी विनंती या कलाकाराने तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र, त्याच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सेटवर मोठ्या कलाकारांना मिळणारी वागणूक आणि कनिष्ठ कलाकारांना मिळणारी वागणूक यात मोठी दरी असल्याचे त्याला प्रकर्षाने जाणवले. या अपमानानंतर त्याने स्वतःला सावरले आणि एक दिवस आपण यशस्वी होऊन असाच आदर मिळवू, असा निश्चय मनाशी पक्का केला.

Advertisement

सिनेसृष्टीतील संघर्षाची वास्तवता

या अनुभवाने सिनेसृष्टीतील संघर्षाची दुसरी बाजू समोर आणली आहे. नव्या आणि कनिष्ठ कलाकारांना अनेकदा अशा प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागतो, असे या कलाकाराने स्पष्ट केले. तरीही त्याने आपली सकारात्मकता ढळू दिली नाही. चित्रपटातील एका संवादाचा उल्लेख करत त्याने म्हटले की, 'संकटेच पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात.' सध्या 'धुरंधर 2' च्या सेटवरील या भेदभावाच्या बातमीने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
 

Topics mentioned in this article