अभिनेते सचिन पिळगावकर हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. खास करून त्यांनी केलेलं कोणतं ही वक्तव्य सोशल मीडियावर एकच धम्माल उडवून देतं. याचा अनुभव नेटकऱ्यांनी अनेक वेळा घेतला आहे. शोलेच्या गब्बरला संवाद कसे बोलायचे हे आपण शिकवले होते हे त्यांचं अलीकडचं वक्तव्य चांगलंच चर्चेत होतं. त्यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं होतं. या धुरळा खाली बसत नाही तोच त्यांनी आणखी एक वक्तव्य करत पुन्हा एकदा धुरळा उडवून दिला आहे. त्यावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार जुगलबंदी जुंपली आहे.
महाराष्ट्र उर्दू साहित्य अकदमीचं सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. पार्श्वभूमीवर बहार ए उर्दू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जावेद अख्तर यांच्या पासून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात सचिन पिळगावकर हे ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले होते. यावेळी अभिनेता शेखर सुमन यांनी सचिन यांची मुलाखत घेतली. त्यावेळी सचिन पिळगावकर यांनी उर्दू भाषे वरील आपलं प्रेम व्यक्त केलं. मात्र हे प्रेम व्यक्त करत असताना त्यांनी नेटकऱ्यांच्या हातात मात्र ट्रोल करण्यासाठी आयतं कोलीत दिल.
यावेळी बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले की, माझी मातृभाषा मराठी आहे. पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला माझ्या बायकोने किंवा कोणीही रात्री 3 वाजता जरी उठवलं तरी मी उर्दूतून उठतो. पुढे ते थांबले नाहीत ते म्हणाले की मी केवळ उर्दूतून उठत नाही तर मी उर्दूसोबत झोपतोही. माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं असं सचिन यावेळी म्हणाले. यावेळी शेखर सुमन यांनी सचिन यांच्या या वक्तव्याचं कौतूक केलं. तर उपस्थितांची याला दाद मिळाली. सर्वांनी त्यांच्या या वक्तव्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
लगेच सचिन यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्या सारखे व्हायरल झाले. त्यानंतर नेटकर अॅक्टीव्ह झाले. त्यांनी पुन्हा एकदा सचिन यांच्यावर टीकेची झोड उठवली. अनेकांनी सचिन यांना नक्की काय म्हणायचे आहे असे विचारले आहे. तर काही जण ही वैचारीत दिवाखोरी असल्याचं ही म्हटलं आहे. आता सचिन यांच्या उर्दू प्रेमामुळे पुढे ते अडचणीत तर येणार नाहीत ना याचीही चर्चा सुरू झाली आहे. उर्दूला विरोध करणारे काही राजकीय पक्ष आहेत. त्यांच्या नेत्यांनी तशी अलिकडे वक्तव्य ही केली आहे. त्यामुळे तेच नेते आता मराठमोठ्या सचिन पिळगावकर यांच्या विरोधात काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.