जाहिरात

Sachin Pilgaonkar: 'सतिशने जाण्या आधी मला मेसेज केला होता तोपर्यंत..' सचिन पिळगावकरांची पोस्ट चर्चेत

गंमत जंमतमुळे अशोक सोबतही त्यांची मैत्री झाली होती असं सचिन यांनी सांगितलं.

Sachin Pilgaonkar: 'सतिशने जाण्या आधी मला मेसेज केला होता तोपर्यंत..' सचिन पिळगावकरांची पोस्ट चर्चेत
मुंबई:

जेष्ठ अभिनेते सतिश शहा यांचे निधन झाले. त्यानंतर जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांचे एक वक्तव्य  जोरदार व्हायरल होत आहे. सतिश शहा यांच्या मृत्यू आधी काय झालं हे सचिन यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की  सतीशने जाण्याआधी मला 12.56 वाजता मेसेज केला होता. या अर्थी तो व्यवस्थित होता. पण कधी काय होईल ते सांगता येत नाही. असं सांगत त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर दुख: व्यक्त केलं आहे. शिवाय आपण दोघे किती चांगले मित्र होतो हे ही त्यांनी सांगितलं आहे.  

सचिन सांगतात 1987 साली सतीश सोबत मी पहिल्यांदा काम केलं ते 'गंमत जंमत' चित्रपटात केलं होतं. त्यानंतर आमची त्याच्या कुटुंबासोबत मैत्री झाली. त्यानंतर आम्ही  एकत्र काम केलं नसलं तरी आमच्या नेहमी भेटीगाठी व्हायच्या असं व्हायरल झालेल्या पोस्ट मध्ये सचिन सांगतात. माझ्या अनेक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सतीश आणि मधु आवर्जून हजेरी लावायचे. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात ते असायचेच असं ती त्यांनी सांगितलं आहे.  

नक्की वाचा - Viral Video: अरे देवा! रस्त्याच्या कडेला भेटले चमत्कारी 'निळे अंडे', 50 दिवसांनी फुटले अन् बाहेर आलं...

गंमत जंमतमुळे अशोक सोबतही त्यांची मैत्री झाली होती असं सचिन यांनी सांगितलं. दुर्दैवाने मधूला अल्झायमर आहे. त्यामुळे तिला फारसं काही आठवत नाही. मधूची काळजी घेता यावी म्हणून  सतीशने किडनी प्रत्यारोपण करून घेतले होते असं ही ते सांगतात.  काही दिवसांपूर्वीच सुप्रिया मधूला भेटायला गेली होती तेव्हा मधूसोबत तिने डान्स केला होता असा दावा  सचिन पिळगावकर यांच्या व्हायरल पोस्ट मधून होत आहे.  

नक्की वाचा - Viral Video: धावत्या कारमधून फोडले 288 फटाके, कुख्यात गुंडाचा थेटे सेनेच्या आमदाराशी संबंध

आज सतीश जाण्याअगोदरच त्याने मला 12.56 वाजता मेसेज केला होता. तो पर्यंत तो ठीक होता. त्याचं असं अचानक जाणं माझ्यासाठी धक्कादायक आहे. कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सतीश शाह यांच्या निधनानंतर या आठवणी जाग्या केल्या आहेत. शिवाय ते भाऊक ही झाले होते. सतिश शहा आणि सचिन यांनी मराठी चित्रपटात काम केलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com