सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरोचा नवा फोटो समोर आला आहे. नवीन फोटोमध्ये हल्लेखोरानने पिवळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. दोन दिवस उलटूनही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो सतत वेश बदलून पोलिसांना चकवा देत आहे. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेची 35 पथके आरोपीच्या शोधात आहेत. संशयित हल्लेखोराचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात तो वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे.
वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. पण तो सैफचा हल्लेखोर नव्हता. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. संशयित व्यक्ती सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीसारखा दिसत होता.
सैफवर हल्ला करणारा आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकातून लोकल किंवा एक्स्प्रेस गाडी पकडून मुंबईच्या आसपास किंवा बाहेरील ठिकाणी गेल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. पोलिसांची अनेक पथके लोकल आणि एक्स्प्रेस रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर हा सराईत दिसत नाही. आजपर्यंत पोलिसांना त्या चोराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडलेला नाही. तसेच त्याच्या कुटुंबीयांची किंवा मित्राचीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही.