Aneet Padda: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात! 'सैयारा' फेम अनीत पड्डाचा लहाणपणीचा VIDEO होतोय व्हायरल

Saiyaara Actress Aneet Padda childhood Acting video: या व्हिडिओमध्ये अनित लहानपणी पिवळा आणि हिरवा कुर्ता घालून स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओवर स्वतः अभिनेत्रीनेही प्रतिक्रिया दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Saiyaara Actress Aneet Padda reacts childhood video: काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैयारा चित्रपटाने बॉलिवूडमध्ये चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडित काढत बॉक्स ऑफिसवर (Saiyaara Box Office Collection) चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपटाची मुख्य नायिका अभिनेत्री अनित पड्डाच्या अभिनयाचेही जोरदार कौतुक झाले. सध्या सोशल मीडियावर सैयारा फेम अभिनेत्रीचा बालपणीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामधील तिचा बालपणीचा धमाल डान्स पाहून नेटकऱ्यांनी चांगलेच कौतुक केले आहे. 

अभिनेत्री अनित पड्डा तिचा पहिला चित्रपट 'सैयारा'( Saiyaara) इतका हिट झाल्यापासून ती खूप चर्चेत आली आहे. एका चाहत्याने अलीकडेच २०१४ मध्ये वार्षिक नाट्य महोत्सवात अनितचा परफॉर्मन्स दाखवणारा एक जुनाAneet Padda Childhood Dance Video)  व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहून त्या चाहतीनेही तिचे तोंडभरुन कौतुक केले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनित लहानपणी पिवळा आणि हिरवा कुर्ता घालून स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओवर स्वतः अभिनेत्रीनेही प्रतिक्रिया दिली आहे. 

Manva Naik VIDEO: नव्या गाडीचा भयावह अनुभव.. मराठी अभिनेत्रीचा संताप, चाहत्यांनाही सावध केलं

पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनितने नमूद केले की या व्हिडिओने तिचा दिवस खास  बनवला. तिने लिहिले, “अरे देवा, हा माझ्यासाठी एक निर्णायक क्षण होता. धन्यवाद, हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद, मी खूप दिवसांपासून ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मी तेव्हा इतकी हसत होते की माझे गाल दुखत होते.” २०१४ मध्ये YouTube वर पोस्ट केलेला व्हिडिओ २०१२-२०१३ च्या वार्षिक थिएटर फेस्टिव्हलमध्ये काढला गेला होता, जेव्हा अनित फक्त दहा किंवा अकरा वर्षांची होती. असंख्य चाहत्यांनी व्हिडिओखाली कमेंट्स केल्या असून तिचे कौतुक केले आहे.  एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना “तू आत्तासारखीच खूप गोंडस दिसतेस असं म्हटलं आहे तर आणखी एकाने तुझा डान्स भन्नाट आहे. असं म्हटले आहे. 

दरम्यान, अभिनेत्रीच्या फिल्मी करीयरबाबत (Aneet Padda Journey) बोलायचे झाले तर ती चित्रपट किंवा अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील आहे आणि अमृतसरमध्ये वाढली आहे. तिने जाहिरातींमध्ये अभिनय करून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. २०२२ मध्ये, तिने काजोलच्या सलाम वेंकी या चित्रपटात एक छोटी भूमिका केली. २०२४ मध्ये, तिने प्राइम व्हिडिओ वेब सीरिज बिग गर्ल्स डोन्ट क्राय मधून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. तिने मासूम नावाच्या मालिकेसाठी एक गाणे देखील गायले आणि संगीतबद्ध केले.

Advertisement

२०२५ मध्ये, तिने युवा सपनो का सफर या संकलन मालिकेत काम केले. पण जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या मोहित सुरीच्या सैयारा या चित्रपटाने तिला घराघरात लोकप्रिय केले. यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी निर्मित, या रोमँटिक नाटकाने रिलीज झाल्यापासून जगभरात ₹५६९.७५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात अहान पांडे देखील मुख्य भूमिकेत आहे.