जाहिरात

Manva Naik VIDEO: नव्या गाडीचा भयावह अनुभव.. मराठी अभिनेत्रीचा संताप, चाहत्यांनाही सावध केलं

Marathi Actress Manva Naik Latest News: अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी त्यांचे स्वतःचेही अनुभव सांगितले आहेत. 

Manva Naik VIDEO: नव्या गाडीचा भयावह अनुभव..  मराठी अभिनेत्रीचा संताप, चाहत्यांनाही सावध केलं

Marathi Actress Manva Naik Instagram Post:  मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची, लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मनवा नाईकचे नाव घेतले जाते. अनेक गाजलेली नाटके, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप पाडली आहे. मनवा नाईक सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेक नवनवीन फोटो, तिचे अनुभव शेअर करत असते. सध्या मनवाच्या नव्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये तिने तिच्या नव्या गाडीचा धक्कादायक अनुभव घेतला आहे. (Marathi Actress Complaint About TATA Nexon Car) 

सविस्तर माहिती अशी की,  अभिनेत्री मनवा नाईकची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने आपल्या नव्या गाडीबद्दलचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने टाटाची NEXON EV गाडी खरेदी केली होती. मात्र ती वारंवार बंद पडत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी त्यांचे स्वतःचेही अनुभव सांगितले आहेत. 

Dashavatar Movie Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'ची धूम! शोज हाऊसफुल्ल; किती झाली कमाई?

मनवाने व्हिडिओमध्ये काय सांगितलं?

“मला आलेला एक भयानक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडे टाटा नेक्सन EV गाडी आहे. आता गाडी आहे म्हणू की होती म्हणू? खरंच कळत नाहीये कारण, गेल्या सहा महिन्यांपासून ती टाटाच्या वर्कशॉपमध्ये जाऊन-येऊन असते. दरवेळी चार-पाच दिवस झाले की ती गाडी बंद पडते. कधी गिअर अडकतो, कधी बॅटरी संपते आणि ही नवीन गाडी आहे.”

“मी टाटा मोटर्स, नेक्सन, ज्यांच्याकडून मी गाडी होती ते…या सगळ्यांना ई-मेल केले आहेत. पण, अजूनही परिस्थिती बदलली नाहीये. सहा महिन्यांत सहा वेळा गाडी बंद पडलीये. गिअर अडकतो, रस्त्यात मध्येच बंद पडते…  गाडी चालवताना भीती वाटते, काळजी वाटते. त्यामुळे गाडी खरेदी करताना तुम्ही सुद्धा काळजी घ्या…” असा सल्लाही तिने आपल्या चाहत्यांना दिला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com