ऐश्वर्या रायच्या 'या' सिनेमामुळे सलमान खानची सटकली होती! म्हणाला होता, "एक कुत्राही गेला नाही.."

Salman Khan On Aishwarya Rai Statement : सलमान खान ऐश्वर्या रायच्या त्या चित्रपटाबद्दल नेमका काय म्हणाला होता?

जाहिरात
Read Time: 2 mins
Salman Khan Latest News
मुंबई:

Salman Khan On Aishwarya Rai Film : सलमान खान आणि संजय लीला भन्साली यांच्या मैत्रीबाबत बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा रंगते. दोघांनी ‘हम दिल दे चुके सनम'या चित्रपटात एकत्र काम केले होते. पण एक काळ असा आला की हे दोघे जिवलग मित्र कट्टर शत्रू झाले. त्यामागचं कारणही खास होता. ते म्हणजे ऐश्वर्या रायची फिल्म ‘गुजारिश'. सलमान खानने भन्साली यांना ख्रिस्तोफर नोलनच्या प्रसिद्ध चित्रपट ‘द प्रेस्टीज'ची डीव्हीडी दाखवली होती, असं सांगितलं जातं. त्या चित्रपटातून प्रेरणा घेऊन भन्सालीने ‘गुजारिश'हा चित्रपट बनवला.सुरुवातीला सलमानला स्वतः या चित्रपटात ऐश्वर्यासोबत काम करण्याची इच्छा होती. पण जेव्हा भन्साली यांनी मुख्य अभिनेता म्हणून ऋतिक रोशनची निवड केली,तेव्हा सलमान खूप नाराज झाला.

काय म्हणाला होता सलमान खान?

सलमानने एका सार्वजनिक कार्यक्रमात भन्साली आणि त्यांच्या चित्रपटाबाबत टीका केली होती. जेव्हा सलमानला गुजारीश चित्रपटाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा सलमान म्हणाला होता, अरे त्यात तर फक्त माशी उडत होती.पण डाससुद्धा पाहायला गेला नाही. अरे,एकही कुत्रा गेला नाही. त्याच कार्यक्रमात जेव्हा एका मुलीने सलमानला विचारले की बॉलिवूडमध्ये मोठं कसं व्हावं,तेव्हा सलमान भन्साली यांच्याकडे बोट दाखवत म्हणाला,“जा त्याला भेट. तो तुझ्यावर चित्रपट बनवेल,स्वतः भरपूर कमावेल,पण तुला काहीच देणार नाही.

नक्की वाचा >> Viral Video : आरारारारा! चाहत्यांना 'AKON'चं इतकं वेड, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सर्वात लोकप्रिय सिंगरची पँटच खेचली

ऋतिक रोशनने सलमानबाबत केलं होतं मोठं विधान

या गोष्टीमुळे ऋतिक रोशनलाही खूप वाईट वाटले.ऋतिक नेहमी सलमानला आपला मार्गदर्शक मानत होता.त्याने दुःख व्यक्त करत म्हटले होते,“मी सलमान भाईला नेहमी चांगला माणूस मानले आहे,आजही त्यांचा खूप आदर करतो.पण एखाद्या दिग्दर्शकाची थट्टा करणे,फक्त त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही म्हणून,हे योग्य नाही.हिरोने कधीही अहंकार बाळगू नये.जेव्हा तुम्ही खूप यशस्वी असता,तेव्हा आणखी उदार आणि प्रेमळ व्हायला हवे.मला खूप दुःख झाले जेव्हा भन्साली सरांबद्दल असे बोलले गेले.शेवटी काळाच्या ओघात दोघांची नाराजी दूर झाली आणि आता ते पुन्हा ‘इंशाल्लाह'मध्ये एकत्र दिसणार आहेत.