Viral News: ऐश्वर्या रायला मुलगी झाली, त्यावेळी सलमानची पहिली प्रतिक्रीया काय होती? आता होतेय Viral

ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न करून आपला संसार थाटला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते अनेक वर्षांपूर्वी संपले असून आजही त्यांच्या जुन्या आठवणी चर्चेत आहेत
  • २०११ मध्ये आराध्याच्या जन्मानंतर सलमानची प्रतिक्रिया घेण्यासाठी सर्व पत्रकार धडपडत होते
  • सलमानने त्यावेळी दिलेली प्रतिक्रीया आता सर्वत्र व्हायरल होत आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

बॉलिवूडमधील सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते संपून आता अनेक वर्षे उलटली आहेत. मात्र, आजही या दोघांशी निगडीत जुन्या आठवणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. 2011 मध्ये जेव्हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना मुलगी (आराध्या) झाली, तेव्हा संपूर्ण माध्यमांचे लक्ष सलमान खानच्या प्रतिक्रियेकडे होते. सर्वच माध्यमांनी यावेळी सलमानला संपर्क करण्याचा आणि त्याची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. काहींना ती प्रतिक्रीया मिळाली ही. त्याच प्रतिक्रिये बाबतचा एक रंजक किस्सा आता समोर आला आहे.

पत्रकार हीना कुमावत यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, आराध्याच्या जन्मानंतर सलमान एका मोबाईल ब्रँडच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. संपादकांकडून सलमानची प्रतिक्रिया घेण्याचे कडक निर्देश त्यांना होते. मात्र, ऐश्वर्या आता विवाहित असल्याने थेट प्रश्न विचारणे अयोग्य वाटत होते. अशा वेळी सलमानला काय विचारावे असा प्रश्नच त्यांना पडला होता. त्यातून त्यांना मार्ग काढायचा होता. त्यामुळे हीनाने फिरवून प्रश्न विचारला होता. त्याच सुमारास सोहेल खानलाही पुत्ररत्न प्राप्त झाले होते. हीनाने विचारले, "काका बनून कसं वाटतंय?" त्याला सलमानने सुचक उत्तर दिले होते. 

नक्की वाचा - Alcohol vs Lifestyle: जास्त मद्यपान करूनही युरोपीय लोक भारतीयांपेक्षा तंदुरुस्त कसे? 'हा' आहे दोघांमधला फरक

या प्रश्नावर सलमानने आपल्या खास शैलीत उत्तर दिले. तो म्हणाला, "फक्त काकाच नाही, तर मी मामा देखील बनलो आहे. माझी प्रार्थना आहे की त्यांना 11 मुलं व्हावीत." सलमानने कोणाचेही नाव घेतले नसले तरी, त्याचा रोख ऐश्वर्या रायकडेच होता, असे मानले जाते. 1999 मध्ये 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर सुरू झालेली ही प्रेमकथा 2002 मध्ये संपुष्टात आली होती. मात्र अशा किश्श्यांमुळे ती आजही चर्चेत राहते. हिना यांच्या मुलाखती मुळे ही चर्चा पुन्हा एकदा होवू लागली आहे. 

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

Advertisement

ऐश्वर्याने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न करून आपला संसार थाटला. दुसरीकडे सलमान आजही अविवाहित आहे. त्यांच्यातील कटू आठवणी मागे टाकून दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. अभिषेकने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ऐश्वर्या एक उत्तम आई आहे आणि आराध्याच्या संगोपनात तिचा मोठा वाटा आहे. मात्र, जुन्या प्रेमाचा हा किस्सा पुन्हा एकदा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. सलमान नक्की त्यावेळी काय बोलला होता हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर ही याबाबत चर्चा रंगली आहे.