Samantha Ruth Prabhu आणि Raj Nidimoru आज लग्नबंधनात अडकणार? ती पोस्ट चर्चेत; काय आहे सत्य?

समंथा आणि राज आज म्हणजेच सोमवारी, १ डिसेंबर २०२५ रोजी लग्नबंधनात अडकणार? त्या पोस्टचा अर्थ काय?

जाहिरात
Read Time: 2 mins

Samantha And Raj Nidimoru To Tie The Knot: गेल्या बऱ्याच दिवसांपासून समंथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांच्यातील नातेसंबंधाची मोठी चर्चा सुरू आहे. समंथा रुथ प्रभू 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरू याला डेट करीत असल्याची खुसपूस सुरू आहे. अद्याप या दोघांनीही आपल्या नात्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र एका सोशल मीडिया पोस्टमुळे या अफवा खरी वाटू लागली आहे. या अफवांनुसार, समंथा आणि राज आज म्हणजेच सोमवारी, १ डिसेंबर २०२५ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. 

समंथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू १ डिसेंबर २०२५ रोजी लग्न करणार?

अफवांवर विश्वास ठेवला तर समंथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (विशेषत: रेडिट) वर व्हायरल होणाऱ्या रिपोट्सनुसार, दोघं आज सोमवार, १ डिसेंबर रोजी तमिळनाडूच्या कोइंबतूरमधील इशा योगा सेंटरमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात लग्न करणार आहेत. मात्र समंथाने यावर अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. 

नक्की वाचा - ब्लॅकमेलिंग, ड्रग्ज आणि डिव्होर्स! समंथावरील खळबळजनक आरोपानंतर मंत्री म्हणाल्या...

समंथा आणि राज निदिमोरू यांच्यातील नातं...

समंथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांची पहिली भेट 'द फॅमिली मॅन' वेब सीरिजदरम्यान झाली. समंथा 'द फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या सीजनमध्ये होती. त्यावेळी समंथा तेलगू अभिनेता नागा चैतन्य याच्यापासून घटस्फोट घेत वेगळी झाली होती. दुसरीकडे राजचंदेखील पहिलं लग्न झालं होतं. त्यानेही पहिली पत्नी श्यामली डे हिला घटस्फोट दिला होता.  

पहिल्या पत्नीची पोस्ट व्हायरल...

राज निदिमोरूची पहिली पत्नी श्यामली डे हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लेखक मायकेल ब्रूक्सचा एक संदेश लिहिण्यात आला आहे. त्यात लिहिलंय...' desperate people do desperate things.' (उतावीळ माणसं उतावीळपणे काम करतात) श्यामलीच्या पोस्टमुळे समंथा आणि राजच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. 

Advertisement