Samantha Marriage : समांथानेच नागा चैतन्यला धोका दिला? राजसोबत सिक्रेट लग्नानंतर अभिनेत्रीवर चाहते संतापले!

नागा चैतन्य याने शोभितासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर त्याला शुभेच्छांपेक्षा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याबाबत त्याने एका मुलाखतीत खेदही व्यक्त केला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins

Naga Chaitanya and Samantha :  दाक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने निर्माता, दिग्दर्शक राज निदीमोरू याच्याशी लग्न गाठ बांधली. २ डिसेंबर रोजी तिने सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो शेअर केला अन् चाहत्यांना धक्काच बसला. समांथा आणि राज यांनी सोमवारी कोयंबतूर येथील इशा योगा सेंटरमध्ये सप्तपदी घेतल्या. समांथाने फोटो शेअर केल्यानंतर त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिला नवजीवनासाठी शुभेच्छा दिल्या तर काही जणांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.

नागा चैतन्यला करावा लागला ट्रोलिंगचा सामना... (Naga Chaitanya was Trolled)

एखाद्याच्या आयुष्यात लग्न हे सुख-समृद्धी आणि आनंद घेऊन येत असतं. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार नागा चैतन्य याने गेल्या वर्षी २०२४ मध्ये डिसेंबर महिन्यात दुसरं लग्न केलं. त्याने शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधली. मात्र या लग्नानंतर त्याला शुभेच्छांपेक्षा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. समांथा आणि नागा चैतन्यमधील दुराव्यासाठी चाहत्यांनी सर्वस्वी शोभिताला जबाबदार धरलं.

तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. तिची आणि समांथाची तुलना केली गेली. याबाबत नागा चैतन्य याने खेद व्यक्त केला होता. 'समांथा आणि मी आम्ही दोघांनी ठरवून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कोणी एक कसा जबाबदार असेल. माझ्या लग्नानंतर मला वारंवार ट्रोल केलं गेलं. याचं मला दु:ख वाटतं' असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

समांथानेच नागा चैतन्यला धोका दिला? 

2 डिसेंबर २०२५ रोजी समांथाने निर्माता, दिग्दर्शक राज निदीमोरू याच्यासोबत लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारचे दावे, आरोप केले जात आहेत. राज निदीमोरू हा विवाहित होता. त्याने श्यामली डे सोबत घेतलेल्या घटस्फोटासाठी समांथा जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. रेडिटवर असंही म्हटलं जातंय की, नागाला समांथा आणि राज यांच्यातील नात्याबद्दल माहिती होतं, यासाठी त्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

Advertisement

एका युजरने दिल्यानुसार...

४ जून २०२१ - फॅमिली मॅन सीजन २ प्रदर्शित

ऑक्टोबर २०२१ - चैतन्य आणि समांथाचा घटस्फोट

२०२२ - राज आणि श्यामलीचा घटस्फोट

१ डिसेंबर २०२५ - समांथा आणि राज यांचं लग्न

दुसऱ्या एका युजरने म्हटल्यानुसार...

समांथा आणि नागा चैतन्य वेगळे का झाले याचं नेमकं कारण कुणालाच माहिती नाही. 

मात्र एक घटस्फोटित महिला पुन्हा लग्न करते तेव्हा ती Move On झाली म्हणून कौतुक आणि अभिनंदन केलं जातं. 

मात्र जेव्हा एक घटस्फोटित पुरुष दुसरं लग्न करतो तेव्हा त्याच्यावर फसवणूकचं लेबल लावलं जातं. 

समांथाने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर चार तासांनी नागाची पोस्ट...

समांथा रूथ प्रभू हिने राज निदीमोरू याच्याशी लग्न केल्यानंतर नागा चैतन्यची प्रतिक्रिया काय असेल याबद्दलची अनेकांना उत्सुकता होती. नागा चैतन्यने त्याच्या धुता या सिरीजमधील एक फोटो शेअर केला असून अभिनेता म्हणून तुम्ही चांगलं काम केलं तर ते लोकांना आवडतं आणि लोकांनी केलेलं कौतुक तुम्हाला आणखी बळ देतं अशा आशयाची एक पोस्ट केली आहे.