Sameer Wankhede Vs Red Chillies Entertainment: दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडवर गंभीर आरोप करत जोरदार प्रतिउत्तर दाखल केले आहे. रेड चिलीजने आपली प्रतिमा खराब करण्याचे काम केले आहे. हे कोणत्याही प्रकारे 'कलात्मक अभिव्यक्ती' नसून, दुर्भावना, सूडाची भावना आणि केवळ पैसा कमावण्याच्या लालसेवर आधारित एक 'सुनियोजित हल्ला असल्याचा आरोप केला आहे. रेड चिलीजने दिलेले उत्तर पूर्णपणे खोट्या बाबींवर आधारित असल्याने ते तत्काळ फेटाळून लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
समीर वानखेडेंचे गंभीर आरोप!
वानखेडे यांनी कोर्टाला सांगितले की, रेड चिलीजने तयार केलेली बदनामीकारक सिरीज इंटरनेटवर अत्यंत वेगाने पसरत आहे, ज्यामुळे एका सन्मानित सरकारी अधिकाऱ्याच्या जीवनावर आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. हे थांबवले नाही, तर होणारे नुकसान कधीही भरून काढता येणार नाही. एका सरकारी अधिकाऱ्याबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी रेड चिलीज कंपनी आपले 'गैरकृत्य' योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा दृष्टिकोन केवळ व्यावसायिक फायदा आणि वैयक्तिक सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे दिसते, असा त्यांनी युक्तिवाद केला.
Jui Gadkari : 'ठरलं तर मग'च्या सायलीला ऐन दिवाळीत झाला 'हा' गंभीर आजार, शेअर केली भावुक पोस्ट
वानखेडे यांनी आरोप केला की, रेड चिलीज केवळ वेब सिरीज पर्यंत थांबले नाही, तर त्यांनी कोर्टात दाखल केलेल्या उत्तरातही प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोर्टानेच 08.10.2025 रोजी सुधारणा अर्ज स्वीकारून प्रतिवाद्यांना समन्स जारी केले होते. याचा अर्थ कोर्टाला यापूर्वीच दिल्लीचे अधिकारक्षेत्र व्यवस्थित स्थापित झाल्याची खात्री झाली आहे. केवळ तक्रारीत नमूद केलेल्या दाव्यांच्या आधारावरच कोर्टाचे कार्यक्षेत्र निश्चित केले जाते आणि ते दावे दिल्लीत खटला चालवण्यासाठी पुरेसे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
रेड चिलीजने वानखेडे यांच्यावर सीबीआयने दाखल केलेल्या एका प्रलंबित एफआयआरचा आधार घेऊन त्यांची प्रतिमा संशयास्पद ठरवण्याचा प्रयत्न केला. यावर वानखेडे यांनी 'निर्दोषतेच्या सिद्धांताचा आधार घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, 'निर्दोषतेचा सिद्धांत' ही केवळ एक कायदेशीर बाब नाही, तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत मिळालेली एक मूलभूत संवैधानिक हमी आहे. केवळ एफआयआर दाखल होणे म्हणजे दोष सिद्ध होणे नाही, ती केवळ तपासाची सुरुवात असते.
त्यांनी जोरदार युक्तिवाद केला की, जर त्या एफआयआरमधील भ्रष्टाचाराचे आरोप खरे असतील, तर कथितरित्या लाच देणारे लोक (जे रेड चिलीजचे सहयोगी असू शकतात) देखील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8 नुसार तितकेच गुन्हेगार आहेत. रेड चिलीज एकाच वेळी एकाच कायद्यांतर्गत स्वतःचा बचाव आणि वानखेडे यांच्यावर हल्ला करू शकत नाही.
ती भूमिका माझ्यासाठीच.... वानखेडेंचा युक्तीवाद
रेड चिलीजने सांगितले की सिरीजमध्ये 'उपहास' असून ती 'पूर्णपणे काल्पनिक आहे, असा होता. वानखेडे यांनी हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले. पात्राचा चेहरा आणि शरीराची ठेवण वानखेडे यांच्याशी मिळती-जुळती आहे. पात्राचे बोलणे, काम करण्याची पद्धत आणि हावभाव वानखेडे यांच्यासारखे आहेत. पात्र चित्रपट उद्योगातील एका प्रभावशाली व्यक्तीला अटक करतो, जी थेट आर्यन खान अटक प्रकरणाशी जोडलेली आहे.
( नक्की वाचा : Rohit Arya : 'मी थोडक्यात वाचले!' 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहितचं होतं भयानक षडयंत्र; मराठी अभिनेत्री हादरली )
पात्र वारंवार "सत्यमेव जयते" या राष्ट्रीय आदर्श वाक्याचा उपहासात्मक पद्धतीने वापर करतो. आर्यन खान प्रकरणाच्या तपासादरम्यान वानखेडे हेच शब्द माध्यमांशी बोलताना वापरत होते. राष्ट्रीय आदर्श वाक्याचा अपमानजनक वापर हा विनोद किंवा उपहास असू शकत नाही. आर्यन खानने स्वतः एका मुलाखतीत ही सिरीज "काही वास्तवापासून प्रेरित असल्याचे कबूल केले होते, ज्यामुळे 'पूर्णपणे काल्पनिक' असण्याचा रेड चिलीजचा दावा खोटा ठरतो.समीर वानखेडे यांनी कोर्टाकडे तात्काळ अंतरिम मनाई हुकूम जारी करण्याची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world