बॉलिवूडमधील कलाकारांची फॅन फॉलोइंग प्रचंड असते. त्यांची फॅन्समधील क्रेझ कुणापासूनही लपवलेली नाही. पण, एखादा फॅन त्याच्या आवडत्या स्टारसाठी काहीतरी खास आणि मौल्यवान सोडून गेल्याचं फारसं ऐकायला मिळत नाही. अभिनेता संजय दत्तसोबत असंच काहीसं घडलं.
संजूबाबा म्हणून फॅन्समध्ये प्रसिद्ध असलेल्या या कलाकारासाठी त्याच्या महिला फॅन्सनं 1-2 कोटी नाही 72 कोटींची मालमत्ता (प्रॉपर्टी) सोडली होती. याबद्दलचा खुलासा त्यानं नुकत्याच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत केला. 2018 मधील या घटनेबाबत त्याला प्रश्न विचारताना संजयनं हा प्रकार घडल्याचं मान्य केलं. पण, त्याचवेळी त्यानं ही मालमत्ता फॅन्सच्या कुटुंबीयांना परत केल्याचं संजयनं स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Sunjay Kapur: 'कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाब... संजय कपूरच्या आईच्या पत्रानं खळबळ! )
नेमकं काय घडलं होतं?
निशा पाटील या फॅन्सनं 2018 साली त्यांच्या आजारपणात संपूर्ण संपत्ती अभिनेत्याच्या नावार केली होती. मुंबईतील 62 वर्षीय गृहिणीने कथितरित्या तिच्या निधनानंतर तिच्या बँकेला तिची मालमत्ता संजय दत्त यांच्या नावावर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 2018 मध्ये ही बातमी खूप चर्चेत होती. मात्र, अनेक वर्षांनंतर संजय दत्तनं याबाबत पहिल्यांदाच खुलासा केला आहे. संजयनं ही सर्व संपत्ती फॅन्सच्या नातेवाईकांना दिली त्याबद्दल त्याचं कौतुक होत आहे.
संजय दत्तनं 1981 मध्ये 'रॉकी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'नाम', 'साजन', 'खलनायक', 'वास्तव' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्याचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच वादळी ठरलं. 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्यानं 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world