Sanjay Narvekar New Car : मराठी सिनेमा ते बॉलिवूड अशी सिनेकारकीर्द गाजवलेल्या संजय नार्वेकर यांनी आपल्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेते संजय नार्वेकर यांच्या घरी नव्या कारचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर नवीन गाडीचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही खूशखबर चाहत्यांना दिली आहे. संजय नार्वेकर यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील कार शोरूमध्ये उपस्थित होते.
संजय नार्वेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला संजय नार्वेकरच्या सिनेकारकीर्दीतील काही खास क्षणाचे फोटो दाखवण्यात आले आहे. त्यानंतर शोरुमचा लूक, कारची सजावट, पूजा विधा असं सर्वकाही व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
(नक्की वाचा- करिश्मा कपूरचे माजी पती संजय आहेत अब्जाधीश, वाचा तिसऱ्या पत्नीला किती सोडली संपत्ती?)
VIDEO
संजय नार्वेकर यांनी टोयोटो फॉर्च्युनर कार खरेदी केली आहे. सफेद रंगाची ही कार आहे. कार खरेदी केल्यानंतर नारळ फोडून कारची पूजा करण्यात आली. त्यानंतर संजय नार्वेकरांनी कारमध्ये बसून कारचा फीलही घेतला. नार्वेकर कुटुंबियांच्या चेहऱ्यांवर आनंद स्पष्ट झळकत होता.