Sundari Song Lyrics: सुंदरी गाण्यातील 'टक टक देखरो'चा अर्थ माहिती आहे का ? संजू राठोडचं गाणं सुपरहिट झालं

Sanju Rathod Sundari Song Lyrics: संजू राठोडने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, नेपाळमध्ये मराठी गाण्यांची प्रचंड क्रेझ आहे. तिथे मराठी गाणी खूप ऐकतात.

जाहिरात
Read Time: 3 mins
Sanju Rathod Sundari Song Lyrics: संजू राठोडच्या सुंदरी या गाण्याला आतापर्यंत 4 कोटी 47 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत.
Sanju Rathod Insta
मुंबई:

Sanju Rathod Sundari Song Lyrics:  संजू राठोड (Sanju Rathod Singer) या 28 वर्षांच्या तरुणाने सध्या मराठी संगीत क्षेत्रात धमाल उडवून दिली आहे. आकर्षक बीट, रॅप, उडती चाल, आकर्षक व्हिडीओ अशी भट्टी त्याने जमवून आणली आहे. सुंदरी (Sundari Sanju Rathod Song) हे त्याचं नवं गाणं सध्या सुपरहिट झालं असून युट्युबवर ते पहिल्या तीन म्युझिक व्हिडीओजपैकी एक आहे. या गाण्यातला एक भाग हा सोशल मीडियावरील रिल्सचं बॅकग्राऊंड गाणं म्हणून वापरला जातोय.  'टक टक देखरो सावरियाँ' असं सर्च केल्यानंतर हे सगळे रिल्स तुम्हाला पाहायला मिळतील. (Trending Reels Music) मात्र या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे हे अनेकांना माहिती नाहीये. 

नक्की वाचा: 'मला नियम शिकवू नका', चिमुकल्याचा अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धटपणा; नेटकऱ्यांचा संताप

प्रचंड संघर्षानंतर मिळालंय यश

संजू राठोड हा बंजारा समाजातील असून त्याचे बालपण हे खडतर होते, तांड्यावरील हा तरुण मेहनतीच्या जोरावर आज यशाच्या शिखरावर येऊन पोहोचला आहे. त्याच्या 'सुंदरी' या गाण्याला युट्युबवर अवघ्या महिन्याभरात 4 कोटी 47 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

नेपाळमध्ये आहे संजू राठोडची प्रचंड क्रेझ

संजू राठोडने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, नेपाळमध्ये मराठी गाण्यांची प्रचंड क्रेझ आहे. तिथे मराठी गाणी खूप ऐकतात. 'शेकी शेकी'  (Shaky Shaky Sanju Rathod Isha Malviya Song) गाणं भारतात ट्रेंड होण्याच्या आधी नेपाळमध्ये ट्रेंड झालं होतं. टॉप 10 मध्ये आलं होतं. तिथं टीक टॉकवरही गाजत होतं.' संजूने संघर्षाच्या काळाबद्दल सांगताना म्हटलं की, 'छंद लागला' गाण्याचं शूट होतं. त्यासाठी 25 हजाराचे बजेट होतं. त्यावेळी सतत पाऊस पडत होता ज्यामुळे व्याजावर पैसे घेत सुटलो, त्यातून डोक्यावर खूप मोठं कर्ज झालं. मित्रांकडूनच घेतलेलं मात्र पैसे परत देऊ शकत नसल्याने ते खूप घाण शिव्या द्यायला लागले, घरी यायचे. संजूने पुढे म्हटलं की, "माझे वडील शेतकरी आहेत, वेल्डींगचे काम करतात. त्यांनी मला शिकवण्यासाठी कर्ज काढून शहरात आले. मी न शिकता मुंबईत गाण्यासाठी आलो. स्ट्रगलिंगच्या काळात त्यांना तोंड कसं दाखवू ही चिंता सतावायची. यापेक्षा मेलेलं बरं असे विचार मनात यायचे. 4-5 दिवस झोपायचो नाही. डिंपल हे माझं पहिलं मराठी गाणं होतं ज्याला 15MN व्हू्यज मिळाले होते. गुलाबी साडीमधील अभिनेत्री माझी मैत्रिण होती, पैसे नसल्याने जुगाड करून ते गाणं बनवलं होतं.  

नक्की वाचा: प्रियाच्या आठवणीने कलाकार भावुक, अभिजीत खांडकेकरला स्टेटवर अश्रू अनावर

'टक टक देख रो सावरियाँ' चा अर्थ काय आहे ? (Sanju Rathod Sundari Song Lyrics)

संजू राठोडच्या 'सुंदरी' गाण्यामधला जो भाग व्हायरल झाला आहे त्याचे शब्द असे आहेत. (Sanju Rathod Sundari Song Lyrics)
 

टक टक देख रो सावरियाँ

टक टक देख रो सावरियाँ

मामी वरा देख देखरा नाचरी

देखो कथो नाचरो  सावरियाँ

याचा मराठीत अर्थ असा आहे की,

तो मुलगा तिच्याकडे आश्चर्याने थक्क होऊन एकटक पाहातो आहे,

आई, ती बघ कशी नाचते आहे,

बघ ती किती सुंदर नाचते आहे.


 

Topics mentioned in this article