
KBC Child Misbehavior Viral Video: लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC) चा १७वा सिझन सध्या सुरू आहे, ज्याचे सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) करत आहेत. अलीकडील एका एपिसोडमध्ये गुजरातमधील एका लहान मुलाने हॉटसीटवर बसल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याशी केलेल्या 'गैरवर्तनामुळे' (Misbehavior) प्रेक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मुलाने बिगबींशी असा काही उद्धटपणे संवाद साधला की नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. (Kaun Banega Crorepati 17 Video Rude Boy Video)
'मला नियम समजावू नका...'
मयंक (Mayank KBC Video) नावाचा हा इयत्ता सहावीतील विद्यार्थी हॉटसीटवर बसल्यानंतर उत्साही दिसत होता. अमिताभ बच्चन यांनी जेव्हा त्याला 'येथे आल्यावर कसे वाटत आहे' असे विचारले, तेव्हा मयंकने थेट म्हटले, “मी खूप उत्साहित आहे सर, पण थेट मुद्द्यावर येऊया. मला नियम माहीत आहेत, तुम्ही त्याचे स्पष्टीकरण देऊ नका.”. मयंकच्या या उद्धटपणामुळे दर्शकवर्ग आश्चर्यचकित झाला. मात्र, बच्चन साहेबांनी त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावाने स्मितहास्य करत खेळ सुरू केला. बिग बींच्या प्रत्येक प्रश्नावर या चिमुकल्याने उर्मटपणे उत्तरे दिली.
VIDEO: प्रियाच्या आठवणीने कलाकार भावुक, अभिजीत खांडकेकरला स्टेटवर अश्रू अनावर
प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर त्याने अतिहुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काही प्रश्नांची उत्तरे मयंकने आत्मविश्वासाने दिली, पण पाचव्या प्रश्नावर त्याचा अतिआत्मविश्वास त्याला महागात पडला. वाल्मीकि रामायण का पहिला कांड कौन सा है?' असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. ज्यावर ए. बाल कांड, बी. अयोध्या कांड, सी. किष्किंधा कांड, डी. सुंदर कांड असे पर्याय होते.
या प्रश्नावर मयंकने कोणताही विचार न करता बी. अयोध्या कांड' लॉक केले, जे चुकीचे होते. योग्य उत्तर 'ए. बाल कांड' होते. सेफ्टी नेट (रु. १०,०००) पर्यंत न पोहोचल्यामुळे मयंकला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. हारल्यानंतर मयंक रडू लागला. “सर, आता मला फोटो मिळणार नाही,” असे तो म्हणाला. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्याला शांत केले आणि प्रेमाने मिठी मारून सांत्वन दिले.
Very satisfying ending!
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) October 12, 2025
Not saying this about the kid, but the parents. If you can't teach your kids humility, patience, and manners, they turn out to be such rude overconfident lot. Not winning a single rupee will surely pinch them for a long time.
pic.twitter.com/LB8VRbqxIC
मुलाचा उद्धटपणा, नेटकऱ्यांचा संताप
या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मुलाला संस्कार शिकवण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडिओ शेअर करत X (ट्विटर) युजरने शेअर करत लिहिले, “मुलांना ज्ञान शिकवा, पण सोबत संस्कारही शिकवा. मी बच्चन साहेबांच्या जागी असतो, तर एवढी गैरवर्तणूक सहन केली नसती. तर आणखी एकाने कमी वयात मुलांच्या हातात मोबाईल देण्याचे हे परिणाम आहेत, असं म्हटलं आहे. थोडक्यात या पोस्टवर अनेक युजर्सनी मयंकच्या पालकांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world