 
                                            Shahrukh Khan On Mannat Rent: बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान याने गुरुवारी, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी 'Ask SRK' सेशन ठेवत चाहत्यांना एक मोठे सरप्राईज (Surprise) दिले. शाहरुखने या सेशनमध्ये चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधी किंग खानने दिलेल्या या सरप्राईजमुळे चाहते भारावून गेले. यावेळी एका चाहत्याने मन्नतमध्ये भाड्याने राहायला मिळेल का? असा सवाल केला, ज्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने सगळेच अवाक झाले. (Shahrukh Khan Ask SRK Session)
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने पाळली गाय, वासरासोबत योग करतानाचा Video आला समोर
चाहत्याने मागितली मन्नतमध्ये खोली
 2 नोव्हेंबर रोजी शाहरुख खान आपला वाढदिवस साजरा करत आहे. यासाठी देशभरातील चाहते मुंबईत दाखल होत आहेत. याच निमित्ताने एका चाहत्याने शाहरुखला विचारले, "तुमच्या वाढदिवसासाठी मुंबईत पोहोचलो आहोत, पण कुठेही खोली मिळत नाहीये. 'मन्नत'मध्ये एक खोली मिळेल का?" यावर किंग खाननेमन्नतमध्ये तर माझ्याकडे एक खोलीही नाही. हल्ली मी स्वतः भाड्याने राहत आहे, असे  मजेशीर उत्तर दिले.
शाहरुखच्या या उत्तराने चाहत्यांमध्ये एकच हशा पिकला.
Mannat mein toh mere paas bhi room nahi hai aaj kal….Bhaade pe reh raha hoon!!! https://t.co/WgU3pUepGt
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 30, 2025
त्याचबरोबर एका चाहत्याने शाहरुखला "सर, मुलींना खूश करण्यासाठी काय करायला पाहिजे?" असा सवाल केला. त्यावर त्याने माझे गाणे ट्राय करा, असा सल्ला दिला. त्याचबरोबर एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या किंग चित्रपटाबद्दल सवाल केला. सर किंग'चा अपडेट तुम्ही द्याल की आम्ही ज्योतिषीला बोलवावे असा सवाल केला. यावर त्याने नाही नाही, ज्योतिषीकडून तर सिद्धार्थ आनंद माझ्या तारखा मागत राहतो, असा खरमरीत रिप्लाय केला. या सेशनमध्ये शाहरुखने सलमान खान (Salman Khan) याचाही उल्लेख केला. वाढदिवसापूर्वी शाहरुखने दिलेल्या या भेटीमुळे चाहते खूप खूश झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
