OMG : बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत थरार! जेव्हा शाहरुख खानने वाचवला एकाच जीव, ऐश्वर्या रायशी खास कनेक्शन

Shah Rukh Khan: ही गोष्ट आहे त्या रात्रीची आहे, जेव्हा अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'खरा हिरो' बनून एका भीषण आगीच्या दुर्घटनेतून एका व्यक्तीचा जीव वाचवला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shah Rukh Khan: शाहरुख खानने रिअल लाईफ हिरोप्रमाणे एका व्यक्तीचा जीव वाचवला.
मुंबई:

Bachchan Diwali Party: बॉलिवूडमधील दिवाळी पार्ट्या म्हणजे फक्त ग्लॅमर, कोट्यवधींची रोषणाई आणि 'तीन पत्ती'चा खेळ नसतो. या पार्टीमध्ये बॉलिवूडचे मोठे स्टार्स त्यांचे संबंध आणि कधीकधी, त्यांची खरी माणुसकीही सिद्ध करतात. दरवर्षीप्रमाणे 2019 मध्येही, महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर इंडस्ट्रीतील सर्वात मोठी दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण बॉलिवूड रोषणाईच्या झगमगाटात न्हाऊन निघालं असताना, याच रात्री एक भयानक अपघात होता-होता वाचला. ही गोष्ट आहे त्या रात्रीची आहे, जेव्हा अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'खरा हिरो' बनून एका भीषण आगीच्या दुर्घटनेतून एका व्यक्तीचा जीव वाचवला.

बच्चन कुटुंबाच्या पार्टीत 'जळता लेहेंगा' 

बच्चन कुटुंबाच्या या दिवाळी पार्टीमध्ये राजकारण, क्रीडा आणि चित्रपट जगतातील देशातील प्रत्येक मोठी व्यक्ती उपस्थित होती. फटाक्यांची आतषबाजी, हास्य-विनोद आणि संगीताच्या सुरांदरम्यान, 'जलसा'च्या अंगणात असंख्य दिव्यांच्या माळा लावल्या गेल्या होत्या.

पार्टी सुरू असताना, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांची मॅनेजर अर्चना सदानंद (Archana Sadanand) इतर पाहुण्यांशी गप्पा मारत होत्या. याच दरम्यान, त्यांचा वजनदार आणि डिझायनर लेहेंगा अंगणात ठेवलेल्या एका पेटलेल्या दिव्याच्या (दिवाळीच्या पणतीच्या) संपर्कात आला. लेहेंगा रेशमी असल्याने, त्याला लागलेली आग वेगाने पसरू लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे पार्टीतील पाहुण्यांमध्ये एकच दहशत पसरली आणि सगळेजण हतबल होऊन पाहत राहिले.

( नक्की वाचा : 300 चित्रपट करणारा सुपरस्टार; पत्नीच्या निधनाने तुटला, अखेर कामवालीच्या नावावर संपत्ती करून संपवलं आयुष्य )
 

'किंग खान'ने घेतली धाव

जेव्हा उपस्थित प्रत्येक जण या घटनेने स्तब्ध झाला होता आणि कोणालाच काय करावे हे सुचत नव्हते, तेव्हा अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) तत्परता आणि समयसूचकता दाखवली.

Advertisement

कोणताही उशीर न करता, शाहरुखने त्वरीत अर्चना सदानंद यांच्या दिशेने झेप घेतली. क्षणार्धात, त्याने स्वत:ची जॅकेट (Jacket) काढली आणि ती वेगाने अर्चनाच्या जळत्या लेहेंग्यावर लपेटली. आग पूर्णपणे शांत होईपर्यंत त्याने ती विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

अर्चनाचा जीव वाचला, पण शाहरुख झाला जखमी

या धाडसी कृतीमुळे अर्चना सदानंद यांचा जीव वाचला. मात्र, या प्रक्रियेत शाहरुख खानलाही (Shah Rukh Khan) आगीमुळे अनेक ठिकाणी भाजले. विशेष म्हणजे, त्याने आपल्या या दुखापतीबद्दल कोणालाही सांगितले नाही आणि अर्चनाला तातडीने वैद्यकीय मदत मिळेल याची खात्री केली.

Advertisement

शाहरुख खानच्या या शौर्याची आणि माणुसकीची माहिती दुसऱ्या दिवशी समोर आली. चित्रपट निर्मात्या फराह खान (Farah Khan) यांनी एका ट्वीटमध्ये या घटनेचा उल्लेख केला आणि शाहरुखला प्रेमाने ‘मोहब्बत-मॅन टू द रेस्क्यू' (Mohabbat-Man to the Rescue) ही उपाधी दिली.
 

Topics mentioned in this article