
Entertainment News: सिनेमाच्या पडद्यावर आनंद आणि रोमान्सचे जग दाखवणारा प्रत्येक कलाकार त्याच्या खासगी आयुष्यातही तितकाच सुखी असेलच असे नाही. अनेक सुपरस्टार्स असे आहेत, जे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दुःख मनात दडवून चेहऱ्यावर खोटे हसू घेऊन पडद्यावर उतरतात आणि प्रेक्षकांना त्यांच्या खऱ्या वेदनांची जराही कल्पना येऊ देत नाहीत. अमाप संपत्ती आणि कीर्ती कमावल्यानंतरही अनेक कलाकारांच्या आयुष्याचा अंत अत्यंत धक्कादायक वळणावर झाला आहे. काहींना तर जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात कंगाल अवस्थेत जगावे लागले. याच यादीतील एक नाव म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते रंगनाथ यांचे, ज्यांची कहाणी तुम्हाला विचार करायला लावेल.
सुपरस्टार अभिनेत्याचा धक्कादायक अंत
तिरुमला सुंदर श्री रंगनाथ हे मूळ नाव असलेल्या रंगनाथ यांनी 1970 च्या दशकात तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी चित्रपटांमध्ये 'कॅरेक्टर रोल' साकारून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘गोपाल-गोपाल', ‘देवराय', ‘अडवी रामुडु' आणि ‘निजाम' यांसारख्या 300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केले. तेलुगु सोबतच तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.
(नक्की वाचा : मैंने प्यार किया कितीदा पाहिलाय? 'या' 5 गोष्टी माहिती आहेत का? सलमानचं सत्य समजल्यावर बसेल धक्का )
चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी ‘शांती निवासम' आणि ‘मोगलिरेकुलु' यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही काम केले. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी, रंगनाथ हे इंडियन रेल्वेमध्ये ‘तिकीट कलेक्टर' म्हणून नोकरी करत होते, पण अभिनयाच्या वेडापायी त्यांनी सरकारी नोकरी सोडली. 1974 साली ‘चंदना' या चित्रपटाद्वारे त्यांनी टॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी जवळपास 40 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका (Lead Role) साकारल्या.

पत्नीच्या सेवेत 15 वर्षे
रंगनाथ यांचे वैवाहिक जीवन सामान्य होते. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठा आघात झाला, जेव्हा त्यांच्या पत्नीला दीर्घकाळ आजारपणामुळे अंथरुणावर पडून राहावे लागले. रंगनाथ यांनी तब्बल 15 वर्षांपर्यंत आजारी असलेल्या आपल्या पत्नीची मनापासून सेवा केली. मात्र, 2009 मध्ये पत्नीच्या निधनानंतर रंगनाथ पूर्णपणे कोलमडून गेले. पत्नीचे जाणे त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता, ज्यातून ते कधीच सावरू शकले नाहीत.
कामवालीला दिली संपत्ती आणि रोख रक्कम
आयुष्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये रंगनाथ यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली होती. त्यांना हैदराबादमधील केवळ 5,000 रुपये भाड्याच्या घरात राहावे लागले. याच काळात त्यांची कामवाली मीनाक्षी हिने त्यांच्या आजारपणात खूप काळजी घेतली आणि त्यांची सेवा केली. या कठीण काळात मीनाक्षीने केलेल्या मदतीमुळे रंगनाथ खूप प्रभावित झाले होते.
अखेरीस, एका दुपारी रंगनाथ यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने साऱ्या सिनेसृष्टीला धक्का बसला. रंगनाथ यांनी आपल्या 'सुसाइड नोट'मध्ये स्पष्टपणे लिहिले होते की, “मीनाक्षीला त्रास देऊ नका.” त्यांनी आपल्या चांगल्या काळातच मीनाक्षीला काही मालमत्ता आणि रोख रक्कम भेट म्हणून दिली होती. पडद्यावर यशाचे शिखर गाठलेल्या एका सुपरस्टारचा खाजगी आयुष्यातील एकाकीपणामुळे आणि पत्नीच्या निधनाच्या दुःखाने झालेला हा शेवट अनेकांना चकीत करणारा आहे.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world