शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशहा म्हटलं जातं. शाहरूखने आपल्या आयुष्यात मोठं यश मिळवलं आहे. आता त्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्याची मुलगी सुहाना खाननेदेखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. तर मुलगा आर्यन खान दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी तयार आहे. तर रेड चिली एन्टरटेनमेंटच्या माध्यमातून गौरी खानदेखील बॉलिवूडचा भाग आहे. फार कमी जणांना शाहरुखच्या बहिणीविषयी माहिती आहे. शाहरुखच्या बहिणीचं नाव शहनाज लालारुख खान आहे. ती लाइमलाइटहून दूर असते. मात्र आईप्रमाणे शाहरुखची सावली होऊन राहते.
शहनाज या शाहरुख खानसोबत मुंबईतील त्याच्या घरी मन्नतमध्ये राहते. लाइमलाइटपासून दूर एक शांत जीवन जगते.
आई-वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे शाहरुख आणि शहनाजचं अख्खं आयुष्य बदललं.
शाहरुखची बहीण शहनाज लालारुख खान या सुशिक्षित आहे. त्यांनी एमए आणि एलएलबीची पदवी घेतली आहे.
त्यांच्या आयुष्यावर वडील मीर ताज मोहम्मद खान याच्या मृत्यूचा मोठा परिणाम झाला.
शाहरुखने एका जुन्या मुलाखतीत वडिलांच्या मृत्यूवेळीची एक घटना सांगितली होती. जेव्हा त्याचे वडील वारले तेव्हा शहनाज त्यांच्या मृतदेहासमोर उभी होती. ती रडली नाही किंवा काहीच बोलली नाही, ती फक्त पाहत राहिली आणि नंतर बेशुद्ध होऊन खाली कोसळली.
या घटनेचा शहनाजच्या मानसिक आरोग्यावर मोठा आघात झाला होता आणि त्यानंतर पुढील दोन वर्षे काहीच बोलली नाही. दोन वर्षे रडलीही नाही. फक्त एके ठिकाणी शून्यात बघत असे.
शाहरुखने त्यावेळी सांगितलं की, तिच्या बहिणीचं आयुष्य बदललं होतं. ज्यानंतर शाहरुख खान कायम बहिणीसोबत उभा राहिला.
एक किस्सा असाही आहे की, शाहरुख जेव्हा स्वित्झलँडमध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेची शूटिंग करीत होतो, तेव्हा शहनाज गंभीर आजारी होती आणि रुग्णालयात दाखळ होती..
डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं होतं, मात्र शाहरुखने त्यांमा उपचारासाठी स्वित्झलँडला आणलं.
शहनाज आजही शाहरुखसोबत राहते आणि त्याची मुलं सुहाना, अबराम आि आर्यनसोबत त्यांचं खास नातं आहे.
शाहरुखने सांगितलं की, त्यांची मुलं आत्यावर खूप प्रेम करतात. शाहरुखचं आपल्या बहिणीप्रती असलेलं प्रेम हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं एक प्रेरणादायी पैलू आहे.