2007 साली शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. महिला हॉकी संघाचा संघर्ष आणि यशाची कथा दाखवणाऱ्या या चित्रपटामुळे देशात हॉकी स्टिक्सची विक्री 30 टक्क्यांनी वाढली होती. चित्रपटाचं शीर्षक गीतही खूप लोकप्रिय झालं. 2007 पासून आजपर्यंत कोणत्याही खेळाच्या स्पर्धेत विजयाचा आनंद या गाण्याशिवाय अपूर्णच वाटतो. हा चित्रपट सुपर डुपर हीट ठरला होता. शहारुख खानचं आणि चित्रपटाचं कौतूकही झाली होतं. पण हा चित्रपट शहारुख आधी अन्य अभिनेत्याला ऑफर करण्यात आला होता.
खऱ्या खेळाडूच्या आयुष्यावर आधारित चित्रपट
हॉकीच्या खेळावर आधारित हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर प्रेरित होता. या चित्रपटात हॉकीपटू मीर रंजन नेगी यांची कथा दाखवण्यात आली. जेव्हा ही भूमिका शाहरुख खानला देऊ करण्यात आली, तेव्हा त्याने लगेच होकार दिला. कारण तो कॉलेजच्या दिवसांमध्ये हॉकी खेळायचा. चित्रपटात ज्या मुलींना हॉकीपटू म्हणून निवडण्यात आलं, त्या सर्वांना तीन ते चार महिने हॉकीच्या शिबिरात प्रशिक्षण देण्यात आलं, जेणेकरून त्यांचा खेळ कृत्रिम वाटू नये. या चित्रपटासाठी शाहरुख खानला त्याचा सातवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रपटासाठी शाहरुख खान पहिली पसंती नव्हता.
शाहरुख पहिली पसंती नव्हता?
IMDb वर उपलब्ध माहितीनुसार, 'चक दे इंडिया'साठी शाहरुख खान पहिली पसंती नव्हता. किंग खानच्या आधी हा चित्रपट सलमान खानला ऑफर झाला होता. मात्र, सलमानसोबत बोलणी का झाली नाहीत, हे कारण उपलब्ध नाही. पण जे काही झालं ते खूप चांगलं झालं, कारण शाहरुख खानने या चित्रपटात चार चाँद लावले. हा चित्रपट आधी सलमना खानला ऑफर करण्यात आला होता. पण शाहरुखला मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले.