जवळपास 3 दशके चित्रपटसृष्टीत असलेल्या आणि बॉलीवूडवर अधिराज्य गाजविणाऱ्या शाहरूख खान याची सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor at the 71st National Film Award) म्हणून निवड करण्यात आली आहे. Jawan चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. शाहरूख खानची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याने त्याचे चाहते आनंदाने खुळे झाले आहेत.
सोशल मीडियावर शाहरूख खानचे नाव ट्रेंडींग टॉपिकमध्ये आले असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अशातच एका दिग्दर्शकाने शाहरूख खानला लिहिलेले प्रेमपत्र चर्चेचा विषय बनले आहे.
( नक्की वाचा: 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची संपूर्ण यादी, पदकासह मिळणार इतके रोख पारितोषिक )
ज्या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहरूख खान याला हा पुरस्कार मिळणार आहे त्या चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली याने इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत शाहरूख खान याचे अभिनंदन करत त्याचे आभार मानले आहेत. त्याने म्हटलंय की, "शाहरूख सर तुमच्या जवळ असणे हेच आशीर्वादाप्रमाणे आहे. सर, मी तुमचा प्रचंड मोठा चाहता आहे त्यामुळे तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे, तुमच्यासोबत चित्रपट करण्याची संधी मिळणे हा मी देवाने दिलेला आशीर्वादच आहे असे मी मानतो. देवाने हे क्षण आयुष्यात आणले याबद्दल मी देवाचाही आभारी आहे. एखाद्याला यापेक्षा आणखी काय पाहीजे ? सर, Love you. Love you. Love you. Lots of love sir."
जवान चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली याने केले होते. या चित्रपटात शाहरूख खान डबल रोलमध्ये दिसला होता. यातील एका रोलमध्ये तो चक्क टकला दाखवण्यात आला होता. हा थ्रिलर-अॅक्शनपट चित्रपट मल्टीस्टारर होता ज्यात नयनतारा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिधी डोग्रा, गिरीजा ओक आणि संगीता भट्टाचार्य यांच्या भूमिका होत्या.