Shahrukh Khan: बापरे! शाहरुख खान मध्यरात्री कबर का खोदत होता? रडत-रडत लाडक्या मित्राला दिला अखेरचा निरोप

Shahrukh Khan Viral Video: एका रात्री चक्क 2.30 वाजता शाहरुखने कोणाची तरी कबर खोदली होती, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shahrukh Khan: शाहरुख खानच्या आयुष्यातील हा अत्यंत भावूक किस्सा आहे.
मुंबई:

Shahrukh Khan Viral Video: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, पण एका रात्री चक्क 2.30 वाजता शाहरुखने कोणाची तरी कबर खोदली होती, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. शाहरुखच्या या कृत्याने त्या रात्री त्याचे कुटुंबीय आणि कर्मचारीही चक्रावून गेले होते. नेमकं असं काय घडलं होतं की सुपरस्टारला मध्यरात्री हे पाऊल उचलावं लागलं? यामागचं कारण आता समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

शाहरुख खानचं प्राण्यांवर, विशेषतः श्वानांवर किती प्रेम आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण त्याच्या लाडक्या कुत्र्याच्या मृत्यूने तो किती विचलित झाला होता, याचा एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान हिच्या काकांनी एका व्हिडिओमध्ये हा हृदयद्रावक खुलासा केला आहे. गौरीच्या काकांनी तिला एक 'चायनीज पेकिंगीज' ब्रीडचा श्वान भेट दिला होता, ज्याच्यावर शाहरुखचंही जीवापाड प्रेम होतं.

Advertisement

( नक्की वाचा : Family Man अभिनेत्याच्या पत्नीला सहाव्यांदा Oral Cancer ची लागण, एकमेकांवरील प्रेम वाचून कराल सलाम! )

मध्यरात्री जेव्हा कबर खोदली...

एकदा शाहरुख शूटिंगसाठी घराबाहेर असताना या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झाला. घरच्या नोकरांनी त्या कुत्र्याला एका कपड्यात गुंडाळून समुद्रकिनाऱ्यावर नेऊन दफन केले. जेव्हा शाहरुख रात्री 2.30 च्या सुमारास घरी परतला आणि त्याला ही बातमी समजली, तेव्हा तो प्रचंड संतापला आणि भावूकही झाला. त्याने तात्काळ कर्मचाऱ्यांना उठवले आणि त्याला कुठे दफन केले आहे ती जागा दाखवायला सांगितली.

शाहरुख तिथेच थांबला नाही, तर त्याने स्वतः ती कबर पुन्हा खोदली आणि त्या श्वानाचा मृतदेह बाहेर काढला. "माझ्या कुत्र्याला असं बाहेर फेकण्याची तुमची हिंमत कशी झाली? तो जिवंत असो वा मृत, तो आपल्यासोबतच राहील," असं म्हणत शाहरुखला रडू कोसळलं होतं. त्यानंतर त्याने त्या श्वानाला आपल्या घराच्या अंगणात सन्मानाने दफन केले.

इथे पाहा VIDEO

गौरीने शेअर केला जुना फोटो

गौरी खानने सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती आणि शाहरुख त्यांच्या लाडक्या कुत्र्यासोबत दिसत आहेत. हा तोच श्वान असावा ज्याचा उल्लेख तिच्या काकांनी व्हिडिओमध्ये केला आहे, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. सध्या शाहरुखकडे 'डॅश', 'हल्क', 'काई' आणि 'जूसी' असे अनेक पाळीव कुत्रे आहेत.

किंग खानचे आगामी चित्रपट

शाहरुख खान सध्या त्याच्या 'किंग' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते.
 

Advertisement