जाहिरात

Family Man अभिनेत्याच्या पत्नीला सहाव्यांदा Oral Cancer ची लागण, एकमेकांवरील प्रेम वाचून कराल सलाम!

Family Man Actor Sharib Hashmi’s Wife Diagnosed with Oral Cancer: 'द फॅमिली मॅन' फेम अभिनेता शारिब हाश्मी सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे.

Family Man अभिनेत्याच्या पत्नीला सहाव्यांदा Oral Cancer ची लागण, एकमेकांवरील प्रेम वाचून कराल सलाम!
Family Man : या कठीण प्रवासात नसरीनने दाखवलेले धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मुंबई:

Family Man Actor Sharib Hashmi's Wife Diagnosed with Oral Cancer: 'द फॅमिली मॅन' फेम अभिनेता शारिब हाश्मी सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे. गेल्या 8 वर्षांपासून त्याची पत्नी नसरीन तोंडाच्या कर्करोगाशी (Oral Cancer) लढा देत आहे. विशेष म्हणजे, नसरीन यांनी आतापर्यंत 5 वेळा या आजारावर मात केली आहे, परंतु दुर्दैवाने 6 व्या वेळी त्यांना पुन्हा या आजाराने गाठले आहे. या कठीण काळातही हाश्मी दांपत्य अत्यंत धैर्याने या संकटाचा सामना करत आहे.

सहाव्यांदा कॅन्सर

शारिब हाश्मीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या पत्नीच्या प्रदीर्घ संघर्षाबद्दल माहिती दिली. नसरीन यांना 2018 मध्ये पहिल्यांदा कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यावर 5 वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शारिबने सांगितले की, नसरीनचा कॅन्सर अत्यंत आक्रमक स्वरूपाचा आहे, ज्यामुळे तो वारंवार उलटून येतो. यावेळी हा आजार शरीरात सर्वत्र पसरला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

( नक्की वाचा : Milind Soman: 60 व्या वर्षी समुद्राला नमवलं! मिलिंद सोमणच्या 'सुपर फिट' राहण्याचं गुपित उघड ! )
 

पत्नीचे धाडस आणि पतीची साथ

या कठीण प्रवासात नसरीनने दाखवलेले धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शारिब म्हणाला की, ती ज्या पद्धतीने या आजाराशी झुंज देत आहे, त्यावरून आम्हालाही बळ मिळते. दुसरीकडे, नसरीननेही शारिबच्या खंबीर पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. शूटिंगच्या गडबडीत असतानाही शारिब वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि डिस्चार्ज मिळेपर्यंत तिथेच थांबून राहतो, असे नसरीन यांनी सांगितले.

शारिब हाश्मीचा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास

शारिब आणि नसरीन यांचा विवाह 27 डिसेंबर 2003 रोजी झाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. व्यावसायिक आघाडीवर शारिब अलीकडेच हुमा कुरेशीसोबत 'तरला' या बायोपिकमध्ये दिसला होता. याशिवाय 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 'द फॅमिली मॅन' मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com