मुंबई: बॉलिवूडचा बादशहा, किंग खान आपल्या कुटुंबासह आपल्या आलिशान मन्नत बंगल्यामध्ये राहतो. शाहरुख खानच्या करोडो चाहत्यांसाठी त्याचा मन्नत बंगला म्हणजे जणू पर्यटन स्थळच आहे. दररोज शाहरुखचे असंख्य चाहते त्याच्या या आलिशान बंगल्याला बघण्यासाठी गर्दी करत असतात. अशातच आता शाहरुख खान हा बंगला सोडून भाड्याच्या घरात राहणार असल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान लवकरच त्याचा आलिशान मन्नत बंगला सोडून दुसरीकडे राहायला जाणार आहे. मे महिन्यापासून शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे आणि विस्ताराचे काम सुरु होणार आहे. त्यामुळेच शाहरुख खानने आपल्या कुटुंबासह दोन वर्षांसाठी हा बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन वर्षांसाठी शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय वांद्रे येथील पाली हिल येथे राहायल जाणार आहेत.
मन्नत बंगल्याला आणखी दोन मजले जोडण्याचा निर्णय शाहरुख खानने घेतला आहे. शाहरुख खानची पत्नी गौरीने नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे अर्जही केला होता. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला.त्याला आणखी दोन मजले बांधण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे आता हे काम सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा - Mahashivratri 2025 : अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या देशातील पाचव्या ज्योतिर्लिंगाची काय आहे आख्यायिका?
शाहरुख खानने अलीकडेच जॅकी भगनानी आणि त्याचे वडील वाशु भगनानी यांच्याकडून दोन डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. हे दोन्ही अपार्टमेंट खार पश्चिम येथील पाली हिल्समध्ये आहेत.यासाठी तो वर्षाला 2.9 कोटी इतके भाडे देईल. दोन्ही अपार्टमेंटचे एकत्रित मासिक भाडे 24.15 लाख रुपये आहे.
यामधील एक फ्लॅट अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी आणि त्याची बहिण दीक्षा देशमुख यांच्या मालकिची असून यासाठी 11.54 लाख प्रति महिना इतके भाडे आहे. तर दुसरा ड्युप्लेक्स फ्लॅट निर्माते वासू भगनानी यांचा असून त्याचे भाडे प्रति महिना 12.61 लाख इतके आहे.