जाहिरात

Eetha Movie: श्रद्धा कपूरचा 'इठा' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! चित्रपटात इतिहासाची तोडफोड; कुटुंबियांचा इशारा

अशातच श्रद्धा कपूरचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इठा चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Eetha Movie: श्रद्धा कपूरचा 'इठा' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! चित्रपटात इतिहासाची तोडफोड; कुटुंबियांचा इशारा

Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: बॉलिवूडची स्टार अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आगामी इठा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावरील या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे.  टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या नावावरुन चांगलाच विरोध झाल्याचे पाहायला मिळाले.  अशातच श्रद्धा कपूरचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इठा चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Salman Khan Health: सलमान खानला झालंय तरी काय? 5 फोटो शेअर करत चिंतेत असलेल्या फॅन्सना दिलं उत्तर

श्रद्धा कपूरचा इठा वादाच्या भोवऱ्यात

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित आगामी इठा चित्रपटाच्या टीझरमध्ये मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखविल्याचा गंभीर आरोप त्यांचे नातू धनंजय खुडे यांनी केला आहे. चित्रपटात तमाशा फडाचे मूळ नाव भाऊ बापू (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळऐवजी भाऊ गावकर तमाशा मंडळ असा चुकीचा उल्लेख केल्याचे, तसेच १९६१ सालच्या राष्ट्रपती पदक वितरण प्रसंगाचे चुकीचे सादरीकरण केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी चित्रपटासाठी कुटुंबीयांची कोणतीही परवानगी घेतली नसून, ऐतिहासिक सत्यतेची पडताळणी न करता हा चित्रपट बनवला जात असल्याचे खुडे म्हणाले. त्यामुळे या चित्रपटाचे नाव बदलून वादग्रस्त बाबींमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अन्यथा चित्रपट निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा विठाबाईंच्या कुटुंबीयांनी दिला आहे. 

38 कोटींची खरेदी, 25 लाखांची नेमप्लेट, आता किंमत तब्बल... शाहरुखच्या 'मन्नत'ची कधीही न वाचलेली स्टोरी!!!

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com