Shefali Jariwala: 'कांटा लगा...' या प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओमुळे एका रात्रीत स्टार झालेल्या शेफाली जरीवाला (Shefali Jariwala Death) हिचे निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला आहे. तिचा फिटनेसही चांगला होता. नियमित व्यायाम करायची तरीही तिला अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.
नक्की वाचा - Shefali Jariwala Death: पहिल्या लग्नात छळ, दुसऱ्यामध्ये आई होण्याचं स्वप्न अपूर्ण! वेदनादायी शेफालीची कहाणी
अँटी एजिंग औषधांचं आणि हृदयविकाराचं काही कनेक्शन आहे का?
शेफाली गेल्या सात ते आठ वर्षांपासून नियमितपणे अँटी एजिंगची (Shefali Jariwala Anti-Aging Injection) औषधं घेत होती. २७ जून रोजी तिच्या घरी पूजा होती. त्यामुळे शेफालीने उपवास केला होता. उपवास असतानाही तिने दुपारी अँटी एजिंग औषधांचं इंजेक्शन घेतलं होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून ती ही औषधं घेत होती. दर महिन्याला ती ही इंजेक्शन घेत होती. ही औषधं हृदयविकाराच्या झटक्यामागील एक प्रमुख कारण असू शकतं असंही सूत्रांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान शेफालीची तब्येत बिघडली. तिचं शरीर थरथरू लागलं आणि अचानक बेशुद्ध पडली. यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
यानंतर फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या निवासस्थानातून विविध वस्तू गोळ्या केल्या आहेत. यामध्ये अँटी एजिंग व्हाईल्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट आणि गॅस्ट्रिक पिल्स सापडले.