2005 मधील चित्रपट 'वक्त : द रेस अगेंस्ट टाइम' मध्ये शेफाली शाह हिने अभिनेता अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. अक्षय कुमार त्यांच्याहून अवघ्या सहा वर्षांनी मोठे आहेत. दिल्ली क्राइम आणि ह्यूमन सारख्या वेब सीरिजमधून छाप सोडणारी अभिनेत्री शेफाली शाह हिने आपण घेतलेल्या या निर्णयाचा पश्चाताप व्यक्त केला. करिअरमध्ये इतक्या लवकरच आईची भूमिका साकारल्याबद्दल तिने खेद व्यक्त केला.
टाइम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की, अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारणं तिच्यासाठी मोठा झटका होता. ही भूमिका साकारत त्यांनी स्वत:साठी कबर खोदली होती.
नक्की वाचा - कचऱ्यात सापडलेल्या मुलीला सुपरस्टारने आणलं घरी; आता अशी दिसते जणू अप्सराच, हॉलिवूड अभिनेत्याला केलंय डेट
पतीचा सल्ला ऐकला नाही....
शेफालीचे पती विपुल अमृतलाल शाह यांनी वक्त चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी शेफालीला हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तिने ऐकलं नाही. अभिनेत्री म्हणाली, माझे पती म्हणाले, हिला घेऊ नका, अमिताभ बच्चन यांनी सल्ला दिली, शेफालीचा या भूमिकेसाठी का विचार केला जात नाही. यावेळी शेफालीचे पती म्हणाले, मला नाही वाटत ही भूमिका तिला सूट करेल. मी वयस्कर दिसण्यासाठी केसात पावडर लावली. त्यावेळीही पतीने असं न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र मला ती भूमिका करायची होती आणि पतीचा सल्ला ऐकला नाही आणि स्वत:च स्वत:ची कबर खोदली.
नुकतच शेफालीचं जलसा (२०२२), डार्लिंग्स (२०२२) आणि थ्री ऑफ अस (२०२३) सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी कौतुक झालं आहे. अवॉर्ड विनिंग नेटफ्लिक्स सीरिज दिल्ली क्राइम सीजन ३ मध्ये शेफालीने डीसीपी वर्तिका चतुर्वेदीची भूमिका साकारली आहे.