Shilpa Shirodkar : 'शिल्पा शिरोडकरची गोळी घालून हत्या...' पालकांचे 25 मिस्ड कॉल; अभिनेत्रीने सांगितला किस्सा...

शिल्पा शिरोडकर त्यावेळी रघुवीर चित्रपटाचं शूटिंग करीत होती. त्यावेळी अचानक एक अफवा पसरली होती. शिल्पाचा गोळी लागल्याने मृत्यू... 

जाहिरात
Read Time: 2 mins

90  च्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar News) हिने नुकतच आपल्या मृत्यूची अफवा पसरल्याचा किस्सा शेअर केला आहे. ही गोष्ट आहे 1995 ची. त्यावेळी शिल्पा शिरोडकर 'रघुवीर' चित्रपटाचं शूटिंग करीत होती. त्यावेळी अचानक एक अफवा पसरली, शिल्पाचा गोळी लागल्याने मृत्यू... 

या चित्रपटात सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत होते. सोबतच  सुरेश ओबेरॉय, सुधा चंद्रन, मोहनीश बहल, अरुणा ईरानी, गुलशन ग्रोवर आणि प्रेम चोप्राही होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शिल्पी शिरोडकरची गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. ही अफवा समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांसह तिच्या घरात शोककळा पसरली. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिला सांगितलं की, हा चित्रपटाच्या प्रमोशनची एक पद्धत होती. (Shilpa Shirodkar death rumours)

Advertisement

शिल्पा शिरोडकरने सांगितला किस्सा...

हे वृत्त समोर आल्यानंतर कुटुंबात गोंधळ उडाल्याचं शिल्पा सांगते. नुकताच शिल्पाने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. ती म्हणाली, मी मनालीत होते आणि माझे बाबा हॉटेलमध्ये सतत फोन करीत होते. त्यावेळी मोबाइल नव्हता. मी सुनील शेट्टीसह शूटिंग करीत होते. तेथे शूटिंग पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्येही गोंधळ उडाला होता. शिल्पाच्या मृत्यू बातमी असता प्रत्यक्षात असलेली अभिनेत्री कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. जेव्हा मी शूटिंग संपवून हॉटेलमध्ये गेले तेव्हा 20 ते 25 मिस्ड कॉल आले होते. माझे आई-बाबा चिंतेत होते. वृत्तपत्रातही माझ्या मृत्यूची बातमी पसरली होती. 

Advertisement