भयंकर! शूटिंग दरम्यान सिहांच्या जबड्यात सापडली होती अभिनेत्री, 'या' प्रकारे वाचला जीव

एका प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अभिनेत्री चक्क सिंहाच्या जबड्यात आढळली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
या मुलीसोबत शूटिंगदरम्यान घडली होती भयंकर घटना
मुंबई:

व्हीएफएक्सच्या युगात टीव्ही आणि सिनेमातील बऱ्याच गोष्टी ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवल्या जातात. विशेषत: वन्य प्राण्यांच्या चित्रपटातील वापरावर आता बंदी घालण्यात आली आहे. पण, एक असा काळ होता की त्यावेळी चित्रपटात खरे-खुरे हिंस्त्र प्राणी दाखवले जात. वाघ, सिंह, हत्ती यासारख्या प्राण्यांसोबत चित्रपटातील प्रसंग चित्रीत केली जातात. त्यामुळे सेटवर कधीकधी भयंकर परिस्थिती निर्माण होत असते. एका प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपटातही असाच एक प्रसंग घडला होता. तो वाचल्यावर तुमचा नक्कीच थरकाप उडेल.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अभिनेत्रीला सिंहानं उचललं...

सिंहाच्या तोंडात सापडलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे जूडी फॉस्टर. ही हॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आहे. तिनं स्वत:चा एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. जुडी लहानपणी देखील चित्रपटात काम करत होती. त्यावेळी नेपोलियन अँड समांथा या सिमेमाच्या शूटिंग दरम्यान ही घटना घडली. 

या शुटींगच्या दरम्यान सिंह अचानक आला आणि तिनं जूडी फॉस्टरला तोंडात पकडलं आणि तो चालू लागला. जूडीनं पुढं सांगितलं की, तिला क्षणभर काय झालं हे समजलंच नाही. ती सिंहाच्या मजबूत दातांमध्ये सापडली होती. तिला सिंहानं जबड्यात पकडून जोरात हलवलं. त्यामुळे तिला क्षणभर भूकंप आला असं वाटलं. 

Advertisement

( नक्की वाचा :  38 वर्षांच्या अभिनेत्रीनं 49 वर्षांच्या 'बाबा' शी केलं दुसरं लग्न, Photo Viral )

कसा वाचला जीव?

पण, जूडी फॉस्टरचं नशीब जोरदार होतं, ती सिंहाच्या जबड्यातून जिवंत बाहेर पडली. वास्तविक जूडीला ज्या सिंहानं पकडलं होतं, तो एक प्रशिक्षित सिंह होता. त्याला रिंग मास्टरनं तातडीनं 'ड्रॉप इट' ही आज्ञा दिली. त्यानंतर सिंहानं तिला शांतपणे खाली ठेवलं आणि तो त्याच्या जागेवर परतला. त्यानंतर सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांनी तिचा जीव वाचवला. नेपोलियन अँड समांथा हा चित्रपट 1972 साली प्रदर्शित झाला होता.