जाहिरात

38 वर्षांच्या अभिनेत्रीनं 49 वर्षांच्या 'बाबा' शी केलं दुसरं लग्न, Photo Viral

मल्याळम टीव्ही अभिनेत्री दिव्या श्रीधर सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. दिव्यानं अभिनेता आणि मोटिव्हेशनल स्पिकर क्रिस वेणूगोपलबरोबर लग्न केलंय.

38 वर्षांच्या अभिनेत्रीनं 49 वर्षांच्या 'बाबा' शी केलं दुसरं लग्न, Photo Viral
टीव्ही अभिनेत्रीनं तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या कलाकाराशी लग्न केलं.
मुंबई:

मल्याळम टीव्ही अभिनेत्री दिव्या श्रीधर सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. दिव्यानं अभिनेता आणि मोटिव्हेशनल स्पिकर क्रिस वेणूगोपलबरोबर लग्न केलंय. तो 49 वर्षांचा आहे. या जोडप्यानं त्यांच्या लग्ना फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. तो फोटो वेगानं व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये दिव्या क्रिसला किस करताना दिसतीय. हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिव्या-क्रिसची लव्ह स्टोरी

दिव्या श्रीधर आणि क्रिस वेणूगोपाल यांची पहिली भेट टीव्ही शो पतरामट्टूच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांंमध्ये आधी मैत्री आणि नंतर काही कालावधीनंतर प्रेम झालं. 

याबाबतच्या वृत्तानुसार अभिनेता क्रिसनं दिव्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांच्या मुलांचाही सल्ला घेतला होता. दिव्याच्या दुसऱ्या लग्नाला तिच्या मुलीनं मान्यता दिली होती, अशी माहिती अभिनेत्रीनं दिली आहे. 

Janhvi Kapoor : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण

( नक्की वाचा : Janhvi Kapoor : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण )

क्रिस वेणूगोपाल अभिनेता आणि लेखक देखील आहे. त्यानं पुल्लू राइजिंग, संबवस्थलथू निन्नूम या टीव्ही शो आणि चित्रपटामध्ये काम केलं आहे. क्रिसबरोबरचं लग्न ही आयुष्याची नवी सुरुवात आहे, असं दिव्यानं सांगितलं. क्रिससारखा जोडीदार मिळाल्याबद्दल आनंदी आहे, अशी भावना तिनं व्यक्त केली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com