जाहिरात

Shocking News: अभिनेत्रीच्या घरी अग्नितांडव! दोन्ही मुलांचा गुदमरुन मृत्यू; मनोरंजन विश्वात खळबळ

Kota Fire News Actress Rita Sharma Sons Death: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपार्टमेंटला लागलेल्या आगीमुळे गुदमरुन प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Shocking News: अभिनेत्रीच्या घरी अग्नितांडव! दोन्ही मुलांचा गुदमरुन मृत्यू; मनोरंजन विश्वात खळबळ

Actress Rita Shrama two sons Death: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपार्टमेंटला लागलेल्या आगीमुळे गुदमरुन प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या कोटामध्ये ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. रीटा शर्मा असं या अभिनेत्रीचे नाव असून तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीसह तिचा मुलगाही बालकलाकार म्हणून मालिकांमध्ये काम करत होता, ज्याचा या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. (Kota Fire News) 

समोर आलेल्या माहितीनुसार,  शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास कोटाच्या अनंतपुरा पोलिस स्टेशन परिसरातील ट्रान्सपोर्ट नगरमधील दीपश्री अपार्टमेंटमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. अचानक आग लागल्याने आणि धुरामुळे गुदमरून दोन भावांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख १५ वर्षीय शौर्य शर्मा  (Shourya Sharma) आणि १० वर्षीय वीर शर्मा (Veer Sharma) अशी आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही मुले अपार्टमेंटमध्ये एकटीच होती. १० वर्षीय वीर शर्मा हा एक नवोदित बाल कलाकार होता आणि त्याने "वीर हनुमान" या लोकप्रिय धार्मिक मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती.

मृत मुलांचे वडील जितेंद्र शर्मा, एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक होते, अपघाताच्या वेळी जवळच असलेल्या जागरण कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांची आई, टीव्ही अभिनेत्री रीता शर्मा (Actress Rita Sharma)  कामासाठी मुंबईला गेली होती. रीता शर्मा सोनी टीव्ही आणि कलर्सवरील दैनिक मालिका आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही दिसल्या आहेत. मुले घरी एकटी होती, त्यामुळे त्यांना वेळेत बाहेर काढता आले नाही.

 दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन्ही मुलांच्या वडिलांनी त्यांचे डोळे दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिसून येते. या दुर्दैवी घटनेने  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, रीता शर्मा यांनी अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.  ते सध्या सोनी टीव्ही, कलर्स आणि इतर वाहिन्यांवरील डेली सोपमध्ये काम करत आहे. यामध्ये कुमकुम, भाग्य किस्मत की लेकीरों पर, स्वराज्य, पुष्पा इम्पॉसिबल, इमली आणि सुहागन सारख्या मालिकांचा समावेश आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com