अभिनेता कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन ही अष्टपैलू अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. अभिनयासोबतच तिच्या गोड गळ्यामुळे ती प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. श्रुती हासन आणि शांतनू हजारिका हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या दोघांची जोडी सिनेविश्वात चर्चेचा विषय बनली होती. हे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकदा विचारला जात होता. मात्र आता ही शक्यता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे आणि या दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. यानंतर हे दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. श्रुतीने अनेक दिवसांपासून शांतनूसोबतचा फोटोही शेअर केलेला नाही. यामुळे या दोघांमध्ये कायमचा दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे. या सगळ्या घडामोडी पाहाता श्रुती आणि शांतनूने एकमेकांना सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याने या दोघांमधले संबंध संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.
श्रुतीने नुकतीच एक पोस्ट केली होती ज्यातूनही अंदाज व्यक्त केला जात होता की ती आणि शांतनू हे वेगळे झाले आहेत. श्रुतीने तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "ही एक वेड लावणारी यात्रा होती, यादरम्यान मला माझ्याबद्दल आणि इतरांबद्दल अनेक गोष्टी कळाल्या."
श्रुतीचा प्रियकर शांतनू हा एक व्हिज्युअल आर्टिस्ट, व्हिडीओ गेम डिझायनर आणि चित्रकार आहे. त्याच्या प्रतिभेवर श्रुती भाळली होती. श्रुती एका पुस्तकावर काम करत असताना तिचा शांतनूशी परिचय झाला आणि या दोघांमधील जवळीक वाढत गेली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world