गडचिरोली प्रिमियर लिग (GPL 2025) किकेट स्पर्धेच्या 8 व्या पर्वाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. या उद्घाटन सोहळ्याला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन (Former Cricket Captain Mohammad Azharuddin), लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe), खासदार डॉ. नामदेव किरसान, विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी श्रुती मराठे आणि मोहम्मद अझरुद्दीन पहिल्यांदाच एका स्टेजवर पाहायला मिळाले. मूळचे हैद्राबादचे असलेले मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतीय क्रिकेट टीमच्या कर्णधारपदी काम केलं आहे. त्यांचं क्रिकेटमधील योगदान मोठं आहे. दरम्यान चित्रपट आणि मराठी मालिकांच्या माध्यमातून मराठी माणसाच्या घरोघरी पोहोचलेली श्रुती मराठेचं क्रिकेटप्रेमही यानिमित्तानं समोर आलं. श्रुती मराठे ही ब्राऊन बेल्ट आहे, त्याशिवाय महाविद्यालयात असताना ती बास्केट बॉलही खेळत होती. विशेष म्हणजे जीपीएलच्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट खेळता येतं आणि कळत असल्याचंही श्रुतीने ठणकावून सांगितलं.
नक्की वाचा - Prithvik Pratap : नुकतंच लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला बायकोने काढले घराबाहेर, व्हिडीओ व्हायरल
मोहम्मद अझरुद्दीन यांनी बोलताना गडचिरोली प्रिमियर लिगचं कौतुक केलं. विशेष म्हणजे त्यांनी श्रुती मराठेचंही कौतुक केलं. श्रुतीने तेलुगु चित्रपटातही काम केलं आहे, हे माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांना जरा धक्काच बसला. मात्र श्रुतीने केलेला तेलुगु चित्रपट (Shruti Marathe Telugu Movie) आवर्जुन पाहिल आणि त्याची प्रतिक्रियाही देईल असं अझरुद्दीन यावेळी म्हणाले.
श्रुती मराठेने मराठीबरोबरच तेलुगु चित्रपटाही काम केलं आहे. देवारा चित्रपटात तिने ज्युनियर NTR च्या पत्नीची भूमिका साकारली आहे. याशिवाय आडू आता आडू (2017) या कन्नड चित्रपटातही काम केलं आहे.