
Singer actor Rishabh Tandon Passed Away : लोकप्रिय गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. पॅपाराझी विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही बातमी शेअर केली. यामुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ टंडन त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्ली येथे आला होता. तेव्हाच अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले.
एका जवळच्या मित्राने ऋषभच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या फोटोंचे आणि आठवणींचे पोस्ट शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.
ऋषभ टंडन हे मूळ मुंबईचे असून तो एक उत्कृष्ट गायक, संगीतकार आणि अभिनेता म्हणून ओळखला जात होता. त्याच्या शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ते इंडस्ट्रीत प्रिय होता. संगीत क्षेत्रातील त्याच्या आवडीमुळे त्याने एक खास स्थान निर्माण केले होते. अभिनयाच्या क्षेत्रातही त्यांनी 'फकीर - लिविंग लिमिटलेस' आणि 'रशना: द रे ऑफ लाईट' अशा चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
(नक्की वाचा: 'माझी भाषा मराठी पण मी विचार उर्दूतून करतो', पिळगावकर बोलले नेटकरी एकवटले)
पॉप्युलर गाण्यांनी मिळवली लोकप्रियता
ऋषभ टंडनला त्याच्या 'फकीर' या गाण्याने लोकप्रियता मिळवून दिली. त्याच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये 'ये आशिकी' , 'चांद तू', 'धू धू कर के', आणि 'फकीर की जुबानी' यांचा समावेश आहे. त्याची अनेक गाणी अजून रिलीज होणे बाकी होती, जी त्यांच्या अचानक जाण्याने आता अपूर्ण राहिली आहेत.
अपूरे राहिलेले काम आणि आठवणी
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ टंडन त्याच्या अनेक नवीन गाण्यांवर काम करत होता. मात्र, त्यांच्या अकाली निधनामुळे ते सर्व काम अपूर्ण राहिले आहे. ऋषभ टंडन यांच्या निधनाने संगीत आणि चित्रपट क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या गाण्यातून आणि अभिनयातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या स्मरणात राहतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world