गायिका अलका याज्ञिकला दुर्मिळ आजार, दोन्ही कानांवर गंभीर परिणाम

हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजार झालाय.

Advertisement
Read Time: 2 mins
गायिका अलका याज्ञिक यांच्या कानांना गंभीर आजार झाला आहे.
मुंबई:

हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या गायिका अलका याज्ञिक यांनी फॅन्सना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलंय.  गेली 4 दशकं वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या याज्ञिक यांच्या कानांना गंभीर आजार झाला आहे. त्यांनी स्वत:चं सोशल मीडियावर ही माहिती दिलीय. त्याचबरोबर सतत हेडफोन्सवर मोठ्या आवाजात गाणं ऐकणाऱ्यांसाठी देखील कळकळीचं आवाहन केलंय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विमानातून उतरल्यावर जाणीव

अलका याज्ञिक यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली आहे. 'काही आठवड्यांपूर्वी मी विमानातून बाहेर पडले त्यावेळी मला अचानक जाणवलं की काहीच ऐकू येत नाहीय. मी या घटनेनंतर काही आठवड्यांनी मोठ्या धैर्यानं माझे सर्व मित्र आणि हितचितंकांसाठी माझं मौन सोडत आहे. मी सक्रीय कामांपासून दूर का आहे? हे प्रश्न ते विचारत आहेत. 

मला डॉक्टरांनी रेयर सेंसरी न्यूरो नर्व्ह हियरिंग लॉस झाल्याचं निदान केलंय. या अचानक झालेल्या आजारानं आणि त्यातून निर्माण झालेल्या नव्या परिस्थितीशी मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझी फॅन्स आणि तरुण सहकाऱ्यांना त्यांनी मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी, संगीत ऐकू नये अशी विनंती आहे. तुम्हा सर्वांचे  प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर , मी माझे आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत करून लवकरच तुमच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे. या आव्हानात्मक काळात तुमचा पाठिंबा, प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन अलका याज्ञिक यांनी केलंय.

Advertisement

ड्रेंडींग बातमी - जीव द्यायला निघालेल्या Pawan Kalyan यांना चिरंजीवींनी कसं सावरलं? राम-लक्ष्मणासारखी आहे या भावांची जोडी
 

सेलिब्रेटींनी केली प्रार्थना

अलका याज्ञिक यांच्या पोस्टवर बॉलिवूडमध्ये जोरदार पडसाद उमटले आहेत. 'सर्व काही ठीक नाही, असं मला वाटतच होतं. मी लवकरच तुला येऊन भेटेन,' अशी प्रतिक्रिया सोनू निगम यांनी पोस्ट केलीय. इला अरुण यांनी देखील तुझी पोस्ट वाचून धक्का बसलाय. तू लवकर या आजारतून बरी होशील आणि तुझा गोड आवाज आम्ही पून्हा ऐकू, अशी प्रतिक्रिया गायिका इला अरुण यांनी दिलीय.