अफवांवर लक्ष देऊ नका... गायक राहत फतेह अली खाननं फेटाळलं अटकेचं वृत्त

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खाननं (Rahat Fateh Ali Khan ) त्याला दुबईत झालेल्या अटकेचं वृत्त फेटाळलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खाननं (Rahat Fateh Ali Khan ) त्याला दुबईत झालेल्या अटकेचं वृत्त फेटाळलं आहे. पाकिस्तानी चॅनेल जियो टीव्हीनं सोमवारी सूत्रांच्या हवाल्यानं  त्याला दुबईत अटक झाल्याचं वृत्त दिलं होतं. फतेह अली खान एका म्युझिक इव्हेंटसाठी लाहोरहून दुबईला गेले होते. गायकानं सोशल मीडियावर त्याच्या अटकेचं वृत्त फेटाळलं आहेय. याबाबतच्या अफवांवर लक्ष देऊ नका असं त्यांनी सांगितलं आहे. 

काय आहे प्रकरण?

यापूर्वी, जियो टीव्हीनं राहत फतेह अली खानच्या विरुद्ध त्याचा माजी मॅनेजर सलमान अहमदनं मानहानीची तक्रार दाखल केल्याचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर त्याला दुबई विमानतळावर अटक केली आणि पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहतनं काही महिन्यांपूर्वीच अहमदची हकालपट्टी केली होती. 

अफवांवर लक्ष देऊ नका

राहत फतेह अली खाननं सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत अटकेचं वृत्त फेटाळलं आहे.  officialrfakworld नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन गायकाच्या टीमनं सांगितलं की, 'राहत फतेह अली खानच्या अटकेबाबत सुरु असलेल्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत.'

Advertisement

या व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खाननं अटकेचं वृत्त फेटाळताना म्हंटलय, मी दुबईमध्ये माझं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे. सर्व काही ठीक आहे. मी तुम्हाला विनंती करतो की अशा निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका. शत्रू ज्याचा विचार करत आहेत, तसं काहीही झालेलं नाही. 
 

दुबईमध्ये गंभीर अपराध

राहत फतेह अली खानला मानहानीच्या आरोपाखाली अटक झाल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं. 2019 साली दुबईतील एका कोर्टानं सोशल मीडियावर मानहानी आणि गैरवर्तनासाठी दोषी ठरलेल्या एका व्यक्तीला AED 250000 दंड आणि 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दोषी व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीची खासगी माहिती आणि फोटो सोशल मीडियावर लीक केले होते. 
 

Advertisement