अभिनेत्री, खासदार, केंद्रीय मंत्री असा प्रवास भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं. मात्र अत्यंत कमी कालावधीत त्यांना अभिनय आणि राजकीय क्षेत्रावर आपला ठसा उमटवला आहे.
माजी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या एकेकाळी टीव्हीचा सर्वाधिक पसंतीचा चेहरा होत्या. राजकारणात येण्याआधी स्मृती इराणी यांनी केवळ अभिनयच नाही तर मॉडेलिंग देखील केले आहे. त्या मिस इंडिया स्पर्धेचा भाग देखील होत्या. मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतही आपले स्थान त्यांनी निश्चित केले होते.
स्मृती इराणी यांना अभिनय क्षेत्रात खरी ओळख एकता कपूरच्या यांच्या 'क्युकी सास भी कभी बहू थी' या शोमधून मिळाली आणि त्या घराघरात पोहोचल्या. स्मृती इराणी यांच्या मॉडेलिंगच्या दिवसातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांना ओळखताही येत नाही.
1998 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत अंतिम फेरीत
स्मृती इराणी या 1998 मध्ये मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी एक व्हिडीओ शूट करण्यात आला, जो काही वर्षांपूर्वी स्मृती यांच्या वाढदिवसाला एकता कपूरने शेअर केला होता. हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये स्मृती यांनी केशरी रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. यामध्ये त्या आपला परिचय देताना दिसत आहेत.
स्मृती इराणी या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या आणि कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसल्या. तेव्हाही स्मृती इराणी म्हटलं होतं की, मला राजकारणात खूप रस आहे.