Smriti Irani Daughter Photos: स्मृती इराणी हे केवळ टीव्ही इंडस्ट्रीमधीलच नव्हे तर राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेमुळे स्मृती इराणी घराघरांत पोहोचली तसेच छोट्या पडद्यावरील ती मोठी कलाकार आहे. नुकतेच स्मृती यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' मालिकेमध्ये दमदार कमबॅक केलंय. या मालिकेस प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेमध्ये तुलसी आणि मिहिरची ऑनस्क्रीन मुलगी परीचा ड्रामा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. पण तुम्ही स्मृती इराणी यांच्या खऱ्या मुलीचे फोटो पाहिले का? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती...
स्मृती इराणींची मुलगी 22 वर्षांची आहे. स्मृती आणि तिचे पती उद्योगपती जुबिन इराणी यांच्या मुलीचे नाव जोइश इराणी असे आहे. 22 सप्टेंबर 2003 रोजी मुंबईमध्ये जोइशचा जन्म झाला.
22 वर्षांची जोइश गोव्यामध्ये 'सिली सोल्स कॅफे अँड बार' चालवते.
कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट जिंकलेल्या जोइशने कमी वयात तिची स्वयंपाकामध्ये आवड असल्याचे ओळखले आणि त्यामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
2019मध्ये जोइशने इयत्ता दहावीची परीक्षा 82 टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने पाककला या विषयाची निवड केली.
2022मध्ये जोइशने 91 टक्के गुणांनी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
जोइशने कराटे खेळामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदकं जिंकली आहेत.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही जोइशच्या नावाचा समावेश आहे.
स्मृती सोशल मीडियावर मुलगी जोइश आणि मुलगा जोहरचे फोटो शेअर करत असते.
स्मृती इराणीने 2001मध्ये उद्योगपती जुबिन इराणीसोबत लग्न केले होते.
जुबिन इराणीचे स्मृतीसोबत हे दुसरे लग्न आहे.