Salman Khan : सुरज बडजात्याच्या पुढच्या सिनेमात सलमान खान नाही तर 'हा' अभिनेता होणार 'प्रेम'

Sooraj Barjatya Next Film : अभिनेता सलमान खानची चित्रपट कारकिर्द घडवण्यात राजश्री प्रोडक्शनच्या सुरज बडजात्यांचा मोठा वाटा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sooraj Barjatya Next Film : सुरज बडजात्यांनी आगामी चित्रपटाबाबत माहिती दिली आहे.
मुंबई:

Sooraj Barjatya Next Film : अभिनेता सलमान खानची चित्रपट कारकिर्द घडवण्यात राजश्री प्रोडक्शनच्या सुरज बडजात्यांचा मोठा वाटा आहे. या दोघांनी 'मैने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'हम साथ-साथ हैं' आणि 'प्रेम रतन धन पायो'  यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहे.   पण सूरज बड़जात्या त्यांच्या आगामी कौटुंबिक ड्रामा चित्रपटासाठी नवीन 'प्रेम'च्या शोधात होते.  आता त्यांनी यासाठी 59 वर्षांच्या सलमान खानऐवजी 40 वर्षांच्या अभिनेत्याची निवड केली आहे. ही बातमी स्वतः सूरज बड़जात्या यांनी दिली आहे.

2006 मध्ये आलेल्या 'विवाह' या रोमँटिक ड्रामामध्ये 'प्रेम'ची भूमिका शाहिद कपूरने साकारली होती, ज्यात अमृता राव मुख्य अभिनेत्री होती. आता या बडजात्यांचा आगामी 'प्रेम' हा सलमान खान नाही तर आयुष्मान खुराना असणार आहे. 

( नक्की वाचा : Kishor Kadam : अभिनेते किशोर कदम यांचे मुंबईतील घर धोक्यात! थेट मुख्यमंत्र्यांना केली विनंती, नेमकं काय घडलं? )

सूरज बड़जात्या यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, "आम्ही मुंबईत आयुष्मान आणि शरवरीसोबत चित्रपटाचे शूटिंग करत आहोत. ही कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. आयुष्मान एक समर्पित आणि उत्कृष्ट अभिनेता आहे. योग्य कथा आणि योग्य कलाकारांसोबत चित्रपटाला एक वेगळाच अनुभव देणे महत्त्वाचे आहे. या चित्रपटात माझ्या इतर चित्रपटांप्रमाणेच अनेक कलाकार आहेत."

ते पुढे म्हणाले, "प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगआधी मला थोडी भीती वाटते. 'मैने प्यार किया'च्या वेळी जशी वाटली होती, तशीच ही भावना आहे. माझ्यासाठी बॉक्स ऑफिसपेक्षा प्रेक्षकांचे कथेसोबत भावनिक नाते जुळणे महत्त्वाचे आहे."

Advertisement

त्यांनी पुढे सांगितलं की, "माझ्यासाठी चित्रपट असो वा शो, हे महत्त्वाचे आहे की तयार केलेले जग प्रामाणिक वाटावे. प्रेक्षकांना असे वाटले पाहिजे की ते त्यांचे स्वतःचे घर आहे. हेच माझे सर्वात मोठे आव्हान आहे."

दरम्यान, आयुष्मान खुराना सध्या रश्मिका मंदानासोबत 'थमा' या हॉरर ड्रामाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, जो मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्सचा भाग आहे.

Topics mentioned in this article