साऊथ सुपरस्टार अभिनेता अजित कुमारच्या कारला भीषण अपघात झाला आहे. दुबईत कार रेसिंग (24H dubai 2025) स्पर्धेत अजित कुमार सहभागी झाला होता. स्पर्धेआधीच सरावादरम्यान त्याच्या कारचा अपघात झाला आहे.
कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातानंतर कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने अजित कुमार अपघातातून सुखरुप बचावला आहे.
"अजित सुरक्षित आहे. हे घडले तेव्हा तो 180 किमी वेगाने गाडी चालवत होता", अशी माहिती अजित कुमारचे मॅनेजर सुरेश चंद्रा यांनी एनडीटीव्हीला दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित कुमार 24H दुबई 2025 कार रेसिंगमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता. रेसिंगपूर्वी अजित कुमारने रेस ट्रॅकवर सरावही केला. मात्र हा सराव सत्र त्याच्यासाठी घातक ठरला. यावेळीच त्याच्या कारचा अपघात झाला.
(नक्की वाचा - Crime News : 550 किमी लांबून यायचे अन् पोलिसांची डोकेदुखी वाढवायचे; दोघांना अटक)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सरावादरम्यानच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे, अजित कुमारचं कारवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर कार रेसिंग ट्रॅकवरून भरकटते. गाडी पुढे बॅरिकेट्सला जाऊन धडकते. कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाल्याचं दिसतंय.
(नक्की वाचा - Nagpur News: लग्नाच्या वाढदिवशीत दाम्पत्याने संपवलं जीवन, सुसाईड नोट वाचून सर्वच सून्न झाले)
अजित कुमारच्या कारने समोरून धडक दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर कारच्या समोरील भागाचे तुकडे तुकडे झाले. अजित कुमारला वेळीच कारमधून बाहेर काढण्यात आले. अजित कुमारच्या टीमने त्याच्या प्रकृतीविषयी कोणतीही अपडेट दिलेली नाही.