मल्याळम अभिनेत्री हनी रोझ हिच्या तक्रारीवरुन प्रसिद्ध व्यापारी बॉबी चेम्मनूर यांना अटक करण्यात आली आहे. बॉबी चेम्मनूर यांनी वारंवार अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप हनी रोझ हिने केला आहे. रोझने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये हा आरोप केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चेम्मनूर यांनी रोझचे आरोप फेटाळून लावले त्यात काहीही तथ्य नसल्याचा दावा केला आहे. एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, हनी रोझच्या तक्रारीवरुन कारवाई करण्यात आली आहे. चौकशीचा एक भाग म्हणून चेम्मनूर यांना अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.
(नक्की वाचा- VIDEO : साऊथ सुपरस्टार अजित कुमारच्या कारला दुबईत भीषण अपघात, व्हिडीओ व्हायरल)
हनी रोझ हिच्या तक्रारीनंतर चेम्मनूरविरुद्ध अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. रोझने तिच्या तक्रारीत चेम्मनूरने तिच्यावर अनेकदा आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला होता.
पोलिसांच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना रोझने म्हटलं की,मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे देखील मी हे प्रकरण मांडले होते. यानंतर त्यांनी आरोपींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले होते.
(नक्की वाचा- Fact Check : शाहरुख खानच्या बायकोनं इस्लाम धर्म स्वीकारला? Viral फोटोचं सत्य काय?)
अभिनेत्रीने 5 जानेवारी रोजी तिचा अनुभव शेअर करताना खुलासा केला होता की, बॉबी चेम्मनूर सतत डबल मीनिंग कमेंट करत होते. इव्हेंटमध्ये तिला फॉलो करत होते. ती सहसा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते, परंतु या प्रकरणात व्यक्त होण्याची गरज होती. हनीने पुढे सांगितलं की, चेम्मनूर तिला आमंत्रित केलेल्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत होता. तसेच सार्वजनिकपणे तिच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करत असे. पोलीस याता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.