साऊथ सुपरस्टार मोहनलालची तब्येत बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल

Superstar Mohanlal Health Update : साऊथ सुपरस्टार मोहनलाल  यांची तब्येत बिघडली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Mohanlal
मुंबई:

साऊथ सुपरस्टार मोहनलाल  (Mohanlal) यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना तीव्र ताप आणि श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं कोच्चीमधील अमृता इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोहनलाल यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मेडिकल स्टेटमेंट जारी केलं आहे. मोहनलाल यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना पुढील पाच दिवस सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मोहनलाल यांची तब्येत बिघडल्यानं त्यांचे फॅन्स काळजीमध्ये आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मल्याळम इंडस्ट्रीमधील जाणकार श्रीधर पिल्लई यांनी मोहनलाल यांची तब्येत बिघडली असल्याच्या वृत्ताा दुजोरा दिला आहे. त्यांनी मोहनलाल यांच्या उपचार करणाऱ्या हॉस्पिटलचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.  

( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेत अमिताभ बच्चन यांचा विवाहित जोडप्यांना महत्त्वाचा सल्ला )
 

पिल्लई यांनी हॉस्पिटलच्या मेडिकल स्टेटमेंटच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, 'मोहनलाल (वय 64) यांना तीव्र ताप असून श्वास घेण्यात त्रास जाणवत आहे. त्यांना व्हायरल संक्रमण झाल्याची शंका आहे. पुढील पाच दिवस त्यांना आराम करण्याबरोबर औषधं घेण्याचा तसंच गर्दीची ठिकाणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.'

अमृता हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. गिरीश कुमार केपी यांनी यावर हस्ताक्षर केले आहेत. 
 

Topics mentioned in this article