जाहिरात

अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेत अमिताभ बच्चन यांचा विवाहित जोडप्यांना महत्त्वाचा सल्ला

Amitabh Bachchan's Advice To Married Couples : अभिषेक-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच अमिताभ बच्चन यांनी विवाहित जोडप्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 

अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेत अमिताभ बच्चन यांचा विवाहित जोडप्यांना महत्त्वाचा सल्ला
Amitabah Bachchan, Abhishek Bachchan, Aishwarya Rai Bachchan
मुंबई:

Abhishek Bachchan Aishwarya Rai Bachchan Divorce Rumors  : बॉलिवूडमधील सुपर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात सर्व काही ठीक नसल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अनंत अंबानी यांच्या मुंबईत झालेल्या लग्नात हे दोघं वेगळे दिसले होते. त्यानंतर काही ठिकाणी ही दोघं वेगवेगळी दिसली आहेत. अभिषेक-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच अमिताभ बच्चन यांनी विवाहित जोडप्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले अमिताभ?

अमिताभ बच्चन होस्ट असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा 16 वा सिझन सध्या सुरु आहे. या सिझनमधील एका शो च्या दरम्यान अमिताभ यांनी हा सल्ला दिला आहे. कौन बनेगा करोडपतीच्या एका ताज्या भागात दिपाली सोनी या स्पर्धक अमिताभ यांच्यासमोर हॉट सिटवर होत्या.

अमिताभ यांनी त्यांना त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत प्रश्न विचारला. त्यावर सोनी यांच्या नवऱ्यानं आमचं अ‍ॅरेंज मॅरेज होतं. पण लवकरच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आता 25 वर्षांपासून एकत्र राहतो. सोनी यांच्या नवऱ्यानं पुढं सांगितलं की, ते जिथं जातात तिथं अनेकदा रिल्स बनवतात. 

अमिताभ बच्चन यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व विवाहित जोडप्यांना एक सल्ला दिला. अमिताभ म्हणाले, ' तुम्ही पती-पत्नींना खूप चांगली आयडिया दिली आहे. भैय्या, जे कुणी नवरा-बायको इथं असतील किंवा कुठंही असतील ते जिथं जातील तिथं एक रिल नक्की बनवा,' असं अमिताभ यांनी सांगितल्याचं वृत्त न्यूज 18 नं दिलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो?
 

अभिषेक बच्चननं दिलं स्पष्टीकरण

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चेवर स्वत: अभिषेकनं एका मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. अभिषेकनं या मुलाखतीमध्ये मुलाखतीत त्याच्या लग्नाची अंगठी दाखवत सांगितले की आम्ही अजूनही एकमेकांसोबत (Still Married)आहोत, असं सांगितलं. 

'मला याबाबत काहीही म्हणायचे नाही. खेदाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी ही संपूर्ण गोष्ट अतिशय विचित्र पद्धतीने मांडली. तुम्ही असे का केले असावे, हे मी समजू शकतो. तुम्हाला काही स्टोरीज् द्याव्या लागतात. हरकत नाही, आम्ही सेलिब्रिटी आहोत, आम्हाला हे स्वीकारावे लागेल,' असंही अभिषेक यावेळी म्हणाला.

ट्रेंडिंग बातमी - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसला अभिषेक बच्चन, व्हायरल फोटो पाहून फॅन्सनी विचारला प्रश्न
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Ex Husband च्या साखरपुड्यानंतर समांथाही पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा, चाहत्यांनी जाहीर केली नाराजी
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेत अमिताभ बच्चन यांचा विवाहित जोडप्यांना महत्त्वाचा सल्ला
film on life of Raj Thackeray? photo from film set went viral
Next Article
Raj Thackeray Movie : राज ठाकरेंची भूमिका साकारणारा 'तो' अभिनेता कोण? रिलीजबाबत हाती आली मोठी अपडेट