VIDEO: 'मी त्याला थांबवायला हवं होतं, पण...' 370 रुपयांची बिर्याणी’ वादावर प्रणित मोरेने मौन सोडलं

हिमांशूला न थांबवणे ही त्याची चूक होती. तो जे बोलला त्यावर प्रेक्षक हसत होते, म्हणून तोही हसायला लागला. त्याने त्याच्या वक्तव्याविरोधात भूमिका घ्यायला हवी होती, असं त्याने म्हटलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 Praneet More apology Video:  सोशल मीडियावर सध्या स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या कार्यक्रमातील '370 रुपयाच्या बिर्याणी'चा वाद चांगलाच पेटला आहे. हिमांशू जांगरा या तरुणाने केलेल्या वादग्रस्त विधानाने हा वाद चांगलाच पेटला. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रणित मोरेने जाहीर माफी मागितली आहे.  प्रणितने त्याच्या माफीनाम्याचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Suraj Chavan: 'मी आत्या होणार' म्हणत जान्हवी किल्लेकरने शेअर केला भन्नाट व्हिडीओ, पाहा संजनाचे डोहाळे जेवण

 या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, हिमांशू जांगराने त्याच्या शोमध्ये जे काही म्हटले, त्यामुळे त्यालाही खूप द्वेषपूर्ण प्रतिक्रिया मिळत आहेत. कदाचित तो या द्वेषास पात्र आहे. हिमांशूला न थांबवणे ही त्याची चूक होती. तो जे बोलला त्यावर प्रेक्षक हसत होते, म्हणून तोही हसायला लागला. त्याने त्याच्या वक्तव्याविरोधात भूमिका घ्यायला हवी होती, असं त्याने म्हटलं आहे. 

 प्रणित मोरेचा माफीनामा

प्रणितने पुढे म्हटले की, त्यावेळी तो थांबवू शकला असता मात्र त्याने हिमांशूला एक व्यासपीठ दिले, ज्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले. यामुळे ज्यांना ज्यांना दुखावले गेले, त्या सर्वांची तो माफी मागू इच्छितो. या वादामुळे त्याच्यावर होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी तो अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे.

Advertisement

त्याचबरोबर प्रणित मोरेने त्याला एक संधी देण्याची विनंती केली आहे. मी स्वतःला एक चांगला माणूस म्हणून सिद्ध करेल. हा माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता. आता मी स्वतःवर आणि माझ्या कंटेंटवर खूप मेहनत घेत आहे. हे बदल त्याच्या भविष्यातील कामात दिसून येतील. मला खूप पूर्वीच माफी मागायची होती, पण त्याचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झाल्यामुळे सर्वांसमोर मांडू शकला नाही, असंही प्रणित मोरेने सांगितले आहे. 

दरम्यान, ज्या शोमध्ये हिमांशू जांगराने "३७० रुपयांची बिर्याणी" याबद्दल लज्जास्पद विधान केले होते, तो शो गुरुग्राममध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याची व्हिडिओ क्लिप वेगाने व्हायरल होत आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणाऱ्या हिमांशूच्या असभ्य विधानावर प्रेक्षक हसले. प्रणितही याचा आनंद घेताना दिसला.

यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि प्रणितला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) कारवाई करत हरियाणाच्या डीजीपींना या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा या दोघांनाही आयोगाने २२ जून रोजी समन्स बजावले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Facebook Down: फेसबुक अन् इंस्टाग्राम अचानक ठप्प का झालं? कारण आलं समोर, लाखो युजर्सना मोठा फटका