जाहिरात

Facebook Down: फेसबुक अन् इंस्टाग्राम अचानक ठप्प का झालं? कारण आलं समोर, लाखो युजर्सना मोठा फटका

पण काही ठिकाणी अजूनही अडचणी येत असल्याचं अनेक युजर्स एक्स अकाऊंटवरून सांगत आहे.

Facebook Down: फेसबुक अन् इंस्टाग्राम अचानक ठप्प का झालं? कारण आलं समोर, लाखो युजर्सना मोठा फटका
  • मेटाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म्सवर संध्याकाळी अचानक तांत्रिक अडचणींमुळे सेवा ठप्प झाली होती
  • भारत आणि जगभरातील लाखो युजर्सचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट्स सर्व्हर डाउनमुळे बंद पडले होते
  • अनेक युजर्सचे अकाउंट्स आपोआप लॉग आउट झाले होते आणि पुन्हा लॉग इन करताना एरर येत होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र  सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'मेटा'च्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या अत्यंत लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सना शुक्रवारी संध्याकाळी अचानक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्राम चालत नव्हतं. ते बंद पडलं होतं. कोणती ही गोष्ट पोस्ट होत नव्हती किंवा ती पाहता ही येत नव्हती. त्यामुळे अनेक युजर्सना चुकल्या सारखे झाले. शिवाय नक्की काय झालं आहे हे ही समजायला मार्ग नव्हता. सर्व्हर डाउन झाल्यामुळे भारत (India) आणि जगभरातील लाखो युजर्सचे अकाउंट्स ठप्प झाले होते हे आता समोर आले आहे. दुपारनंतर युजर्सना हे अ‍ॅप्स वापरताना आणि स्क्रोल करताना मोठ्या अडचणी येत होत्या.

नक्की वाचा - Kalyan News: 7 दिवसांच्या मुलीला कचऱ्यात फेकलं, कुत्र्यांनी बाळा भोवती कडं केलं, हल्ला करणार तेवढ्यात...

अनेक युजर्सचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट्स आपोआप लॉग आउट झाले होते. पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असता एरर येत असल्याचे युजर्सनी सांगितले. तसे अनेकांसोबत झाले. याशिवाय इंस्टाग्रामवर फीड रिफ्रेश न होणे, नवीन रील्स, स्टोरीज किंवा पोस्ट लोड न होणे अशा समस्या येत होत्या. अजून ही काही जणांना या समस्यांचा सामना करावा लागत होता. अनेक युजर्सना मेसेज पाठवतानाही अडचण येत असून, त्यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर आपल्या तक्रारी मांडल्या आहेत. त्यामुळे अनेकांना या अडचणीची कल्पना आली. 

नक्की वाचा - Sachin Tendulkar: सचिन खेळला विमानात क्रिकेट, लेकी- सुनेनं केली बॉलिंग, विकेट कुणी घेतली? पाहा Video

हे दोन्ही प्रमुख प्लॅटफॉर्म्स मेटा (Meta) कंपनीच्या मालकीचे आहेत. या मोठ्या तांत्रिक बिघाडावर आणि आउटेजवर कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सर्व्हर कधीपर्यंत पूर्ववत होणार, याकडे युजर्सचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी ते पूर्ववत झाल्याचे सांगितले जात आहे. पण काही ठिकाणी अजूनही अडचणी येत असल्याचं अनेक युजर्स एक्स अकाऊंटवरून सांगत आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com